चंद्रपूर : अवघ्या सात दिवसांच्या मुलीला रस्त्यावर टाकून बापाने पळ काढला. ही बाब लक्षात येताच गावकऱ्यांनी त्याला पकडले आणि ग्रामपंचायत कार्यालायात डांबून ठेवले. मुलीला उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. ही घटना गोंडपिपरी तालुक्यातील विठ्ठलवाडा येथे शनिवारी घडली. पोलीसांनी वडिलाला ताब्यात घेतले आहे. गोंडपिंपरी तालुक्यातील शिरशी बेरेडी येथील कुमोद पौरकर या युवकाशी विठ्ठालवाडा येथील भाग्यश्री शालीक देवतळे हिचा विवाह झाला होता. या दोघांना सात दिवसांपूर्वी मुलगी झाली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : विवाहितेचा गर्भपात करून अर्भक जंगलात पुरले ; पती, सासू, सासऱ्यासह अन्य ७ जणांविरोधात गुन्हा

शनिवारी मुलीला बघण्यासाठी वडील कुमोद आला होता. या दरम्यान पती-पत्नीमध्ये भांडण झाले. कुमोद सात दिवसाचा मुलीला घेऊन निघाला, भाग्यश्री त्याचा मागे मागे धावत होती. आरडाओरडा होताच कुमोदने मुलीला भर रस्त्यात टाकून पळ काढला. मात्र, गावकऱ्यांनी त्याला पकडले आणि विठ्ठलवाडा ग्रामपंचायत कार्यालयात कोंडले. पोलिसांनी घटनास्थळ गाठून कुमोद पौरकारला ताब्यात घेतले. मुलीला रस्त्यात टाकल्याने तिला दुखापत झाली आहे. मुलीची हालचाल बंद झाली होती. तिला उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. सध्या तिची प्रकृती स्थिर आहे.