बुलढाणा : बुलढाणा तालुक्यातील  कोलवड या आपल्या मूळ गावाकडे येत असलेल्या बापलेकाच्या दुचाकीला भरधाव वेगात असलेल्या काळीपिवळी टॅक्सीने समोरून जोरदार धडक दिली. यामुळे बापलेकाचा जागेवरच दुर्दैवी मृत्यू झाला आज  मंगळवारी १९ नोव्हेंबर रोजी  सायंकाळी  बुलढाणा-धाड मार्गावरील हतेडी प्राथमिक आरोग्य केंद्राजवळ ही दुर्घटना  घडली आहे. प्राप्त माहितीनुसार  बुलढाणा तालुक्यातील कोलवड येथील विजय शेषराव जाधव( वय ४० वर्ष) आणि पुत्र कार्तिक विजय जाधव (वय ११ वर्ष) हे दोघे बापलेक दुचाकीने धाडकडून कोलवडला येत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> किमान तापमानात झपाट्याने घट, थंडीचा कडाका आता वाढणार…

दरम्यान बुलढाण्याहून धाडच्या दिशेने जात असलेल्या काळीपिवळी टॅक्सीने हतेडीच्या प्राथमिक आरोग्य केंद्र जवळ दुचाकीला समोरून जोरदार धडक दिली. या धडकेत दोन्ही बापलेक हवेत भिरकावल्या गेले. .गंभीर अवस्थेत त्यांना बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले . मात्र  डॉक्टरांनी दोघांना मृत्यू घोषित केले आहे. या घटनेमुळे कोलवड गावात शोककाळा पसरली आहे. घटनेची माहिती मिळताच  शिवसेना नेत्या जयश्री शेळके आणि आमदार संजय गायकवाड यांचे पुत्र मृत्युंजय गायकवाड देखील आपापल्या कार्यकर्त्यांसह जिल्हा सामान्य रुग्णालयात पोहोचले . त्यांनी आपद्ग्रस्त परिवाराचे सांत्वन केले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Father son killed on the spot in bike taxi collision scm 61 zws