नागपूर : नागरिकांना भेसळयुक्त अन्नपदार्थ मिळू नये म्हणून अन्न व प्रशासन विभागाने (एफडीए) शहरातील खाद्यपदार्थ उत्पादक, वितरकांची झडती सुरू केली आहे. यावेळी ११८ नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागपुरातील सोनपापडी, सोनरोड, संत्राबर्फीला देशभरात मागणी आहे. सणासुदीत जास्त नफा कमावण्यासाठी काही जण भेसळयुक्त वस्तू वापरतात. त्यामुळे नागरिकांचा जीव धोक्यात येऊ शकतो. ही बाब लक्षात घेऊन एफडीएने तपासणी मोहीम हाती घेतली आहे. तपासणीचा अहवाल आल्यावर संबंधितांवर नियमानुसार कारवाई करणार असल्याचे अन्न व औषध प्रशासन विभागाचे (अन्न) सहआयुक्त क. रं. जयपूरकर यांनी प्रसिद्धीपत्रकातून स्पष्ट केले आहे.

हेही वाचा – ‘समृद्धी’वर भरधाव कारचा टायर फुटला, अपघातात पाच प्रवासी जखमी

हेही वाचा – नागपूर : मेडिकलच्या रुग्णांना पराठा, पुलाव, शिरा, पकोड्याची मेजवानी; दिवाळीत तोंड गोड करणार

प्रयोगशाळेत तपासणीला पाठवलेले नमुने

पदार्थाचे नाव – नमुन्यांची संख्या

तूप, वनस्पती – १०

खोवा, मावा – ०५

मिठाई – ३८

नमकीन फरसाण – ०२

खाद्यतेल – ४७

मैदा, रवा, बेसन, सुखा मेवा व तत्सम पदार्थ – १६

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fda raids food manufacturers and distributors on the occasion of diwali in nagpur mnb 82 ssb
Show comments