राजेश्वर ठाकरे, लोकसत्ता

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागपूर : नागपूर लोकसभा मतदारसंघात महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत होत असून महायुतीतर्फे भाजपचे नितीन गडकरी तर आघाडीतर्फे काँग्रेसचे विकास ठाकरे यांचा प्रचार शिगेला पोहचला आहे. शहरात विधानसभेचे सहा मतदारसंघ असून प्रत्येक मतदारसंघाचा कौल महत्त्वाचा ठरणारा आहे. २०१९ च्या निवडणुकीत सहापैकी उत्तर नागपूरमध्ये काँग्रेस तर उर्वरित पाच मतदारसंघात भाजप आघाडीवर होती. पाचपैकी पूर्व नागपुरातून भाजपची आघाडी सर्वाधिक होती. त्यामुळे २०२४ साठी काँग्रेसने पूर्व नागपूरसह इतर मतदारसंघावर तर भाजपने उत्तर नागपूरवर लक्ष केंद्रित केले आहे.

नागपूर लोकसभा निवडणुकीत भाजप विरुद्ध काँग्रेस असा सामना रंगणार हे निश्चित आहे. दोन्ही पक्षांनी यात्रा काढून लोकांशी संपर्क वाढवण्यावर भर दिला आहे. समाजमाध्यमांवरही दोन्ही पक्षांनी जोरदार आघाडी उघडली आहे. परस्पर विरोधी उमेदवारांपैकी एक केंद्रीय मंत्री आणि दुसरा आमदार असल्याने त्यांचा आधीपासून जनसंपर्क आहे.

आणखी वाचा-जयंत पाटील म्हणतात, ‘संविधान बदलण्याचा कट हा ‘त्यांच्या’ ४०० पारच्या घोषणेतून…”

भाजपने येथे सलग दोनदा विजय मिळवला आहे. मतांची टक्केवारी देखील वाढली आहे. पण, दोन्ही वेळा भाजपला उत्तर नागपुरातील मतदारांचा पाठिंबा मिळवता आला नाही. गडकरी यांना उत्तर नागपूर विधानसभा मतदारसंघात ८७ हजार ७८१ तर काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले यांना ९६ हजार ६९१ मते मिळाली होती. एवढेच नव्हेतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने चांगलीच मुसंडी मारत दोन मतदारसंघात विजय मिळवला. दोन मतदारसंघात केवळ चार हजार मतांनी भाजपकडून पराभव स्वीकारावा लागला. याची जाणीव गडकरींनाही आहे. तरी देखील त्यांनी यावेळी पाच लाखांच्या मताधिक्क्याने जिंकण्याची घोषणा केली आहे. सोबतच उत्तर नागपुरातील मतांचा अनुशेष दूर करण्यासाठी या मतदारसंघावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे.

आणखी वाचा-नागपूर: मनोरुग्णांमध्ये तीन वर्षांत ९९ वेळा हाणामारी

काँग्रेसला २०१९ च्या लोकसभा निवडणुुकीत पूर्व नागपुरात सर्वांधिक फटका बसला. येथे काँग्रेसला ६० हजार ७१ मते तर भाजपला १ लाख ३५ हजार ४५१ मते मिळाली. एवढेच नव्हेतर दक्षिण आणि दक्षिण-पश्चिम नागपूरमध्ये काँग्रेस आणि भाजपच्या मतांची दरी वाढली. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत मात्र काँग्रेससाठी समाधानाची बाब ठरली. त्यामुळे काँग्रेसने पूर्व आणि दक्षिण-पश्चिम नागपूरमधून मतांची टक्केवारी वाढावी, यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

नागपूर लोकसभा २०१९चे चित्र

विधानसभाकाँग्रेसभाजप
दक्षिण-पश्चिम६५०६९१२०१८५
दक्षिण७१४२१११४९४५
पूर्व६००७११३५४५१
मध्य७३८४९९६३४६
पश्चिम७५६६४१०२९१६
उत्तर९६६९१८७७८१

नागपूर लोकसभा २०१४चे चित्र

विधानसभाकाँग्रेसभाजप
दक्षिण-पश्चिम४४,००२१,०६,७२५
दक्षिण४४,७२८१,०५,००
पूर्व४७,२२६१,१२,९६८
मध्य५४,२१५९४,१६२
पश्चिम५६,२४१९३,२५६
उत्तर५६,२०६७४,७४६