अमरावती : राज्‍यात एकूण ४० ठिकाणी भाजपला धोका असल्‍याचा अहवाल त्‍यांनीच केलेल्‍या सर्वेक्षणातून समोर आला असून महाराष्‍ट्रात भाजपची स्थिती बिकट असल्‍याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रचारक म्‍हणून वारंवार महाराष्‍ट्रात यावे लागत आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्‍यक्ष नाना पटोले यांनी येथे पत्रकारांशी बोलताना केली.येथील कॉंग्रेस भवनात आयोजित अमरावती विभागीय आढावा बैठकीनंतर त्‍यांनी पत्रकारांशी संवाद साधला. नाना पटोले म्‍हणाले, भाजपला महाराष्‍ट्रात धोका आहे, हे भाजपचे नेतेच मान्‍य करीत आहेत. राज्‍यातील भाजपचे नेते निष्‍फळ ठरले आहेत. म्‍हणून अनेक लहान मोठ्या कार्यक्रमांसाठी पंतप्रधान वारंवार महाराष्‍ट्रात येत आहेत.

राज्यातील एकूण परिस्थिती पाहता काँग्रेस मधील बड्या नेत्याला आपल्या पक्षात आणून काही पडझड रोखता येईल का? असा प्रयत्न भाजपाकडून होत आहे. याचाच एक भाग म्हणून आमचे नेते सुशीलकुमार शिंद यांच्याशी देखील भाजपाने सलगी साधत आपल्या पक्षात येण्यासाठी प्रयत्न केलेत असा आरोप देखील नाना पटोले यांनी केला. सुशीलकुमार शिंदे काँग्रेस सोडून जाणार नाहीत, हेही त्‍यांनी स्पष्ट केले आहे. भाजपाकडे विचारसरणी राहिलेली नाही, काहीही करून सत्ता मिळवणे व सत्तेतून जनतेच्या घामाचे पैसे कसे लुटायचे एवढीच त्यांची विचारधारा राहिली आहे, देश विकून देश चालवला जात आहे. भाजपाकडे नेते नाहीत व उमेदवारही नाहीत, त्यांच्या पक्षात काँग्रेस व इतर पक्षातीलच अनेक नेते आहेत. महाराष्‍ट्रात महाविकास आघाडी बळकट झाली, हे भाजप देखील मान्‍य करीत आहे, असे नाना पटोले म्‍हणाले.

Direct tax rises 16 prcent to Rs 16.9 lakh crore in FY25
वैयक्तिक प्राप्तिकरातील वाढ अर्थव्यवस्थेसाठी वरदान; प्रत्यक्ष कर संकलन १२ जानेवारीपर्यंत १६.९० लाख कोटींवर
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Seizure and attachment action against 3000 properties for non-payment of property tax
मालमत्ता कर थकबाकीदारांच्या दारात आता बॅण्डवादन
lokmanas
लोकमानस: उपभोग, गुंतवणूक, निर्यातीत वाढ आवश्यक
Loksatta editorial on Goods and Services Tax GST Collection
अग्रलेख: अल्पात अडकणे अटळ?
Agriculture Commissioner, traders ,
शेतीमाल हमीभावाने खरेदी न करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करा, कृषी आयुक्तांचे आदेश
recession in grains market recession still hangs over agricultural economy
क कमॉडिटीचा – कडधान्य मंदीच्या विळख्यात
Indrayani river foams before Chief Minister Devendra Fadnavis visit to Alandi
इंद्रायणी पुन्हा फेसाळली; देवेंद्र फडणवीस याकडे लक्ष देणार का?

हेही वाचा >>>अमरावती : नंबर प्लेट बदलून धावत होत्या बस, ‘आरटीओ’ने…

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर हे अमरावती लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार असतील अशी चर्चा सुरू आहे का, असे विचारले असताना प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत कुठलीही चर्चा झाली नसल्याचे नाना पटोले यांनी स्पष्ट केले. प्रकाश आंबेडकर यांच्याबाबत महाआघाडीतील शरद पवार, उद्धव ठाकरे या सर्वांचे मत घेऊनच विचार केला जाईल, असे देखील नाना पटोले म्हणाले.

Story img Loader