Ayodhya Ram Mandir Opening Ceremony : अयोध्येतील राम मंदिरात भगवान रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळा सुरू झाला आहे. यानिमित्ताने देशभरात उत्साहाचं वातावरण आहे. तसंच, देशभरातील विविध राम मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तर, अनेक भक्तगण त्यांना जमेल त्या पद्धतीने भगवान रामासाठी योगदान देत आहेत. प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी विश्वविक्रम रचण्यासाठी सहा हजार किलो शिरा बनवण्यास नागपूर येथे सुरुवात केली आहे. या शिऱ्यासाठी जगातील सर्वांत मोठी कढई तयार करण्यात आली आहे. या कढईचे वैशिष्ट्य आपण जाणून घेऊयात.

सहा हजार किलो शिरा तयार करण्याकरता भलीमोठी कढई तयार करण्यात आली आहे. ही कढई जगातील सर्वांत मोठी कढई असल्याचा दावा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. या कढईला हनुमान कढई म्हणतात. तर ही कढई विष्णू मनोहर राम मंदिराला अर्पण करणार आहेत. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकाराने नागपूर येथे विष्णू मनोहर सहा हजार किलोचा हलवा बनवणार आहेत.

One crore reward Manyachiwadi, Manyachiwadi,
सातारा : मान्याचीवाडी अव्वलस्थानासह एक कोटीच्या बक्षिसाची मानकरी, ‘माझी वसुंधरा’ अभियानात प्रथम क्रमांकाची ‘हॅट्रिक’
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
Mahayuti Social Outreach through various programs in Nashik print politics news
नाशिकमध्ये महायुतीचे विविध कार्यक्रमांद्वारे सामाजिक अभिसरण
Phulewada Replica in Pune
पुण्यातील फुलेवाडा प्रतिकृतीसाठी नाशिकमध्ये जागा – मुख्यमंत्री
maharashtra first floating solar power project in will be set up in arvi taluka
राज्यातील पहिला तरंगता सौरऊर्जा प्रकल्प आर्वीत साकारणार
Pench tiger project administration, Villagers
पेंच व्याघ्रप्रकल्प प्रशासनाविरोधात गावकरी रस्त्यावर
Important observations in the hearing letter of the National Green Tribunal regarding development works by blocking drains
नाले बंदिस्त करून विकासकामे करणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांना चपराक; राष्ट्रीय हरित न्यायाधीकरणाच्या सुनावणी पत्रात महत्वाची निरीक्षणे
Cleanliness of Pratapgad in view of the visit of the UNESCO team satara
‘युनेस्को’ पथकाच्या भेटीच्या पार्श्वभूमीवर प्रतापगडची स्वच्छता

काय आहेत हनुमान कढईचे वैशिष्ट्ये?

ही हनुमान कढई १५ हजार लिटर क्षमतेची असून १८०० क‍िलो वजन व १५ फूट व्‍यासाची आहे. ही कढई तयार करण्‍यासाठी ६ मी.मी. जाडीचा स्‍टीलचा पत्रा वापरला गेला असून हा पत्रा धरणाची दारे किंवा जहाज बांधणीसाठी उपयोगात आणला जातो. कढईचा तळभाग लोखंड व तांबे या धातूंपासून तयार करण्‍यात आला आहे. तो १० फूट आकाराचा आहे.

हेही वाचा >> “ज्या क्षणाकरता विसाव्या वर्षी तुरुंगात गेलो…”, प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त फडणवीसांकडून जुन्या आठवणींना उजाळा

दोन धातूंचे पत्रे एकावर एक तळाशी लावल्‍यामुळे ते उष्‍णता शोषून घेतील आणि शिरा जळणार नाही. या कढईत वापरला जाणारा एक सराटा हा २४ इंच रुंदीचा असून ३२ क‍िलो वजनाचा आहे. ही कढई विश्‍वकर्मा फॅब्रिकेशन वर्क्‍स, एमआयडीसी, नागपूर येथे नागेंद्र विश्‍वकर्मा व त्‍यांचे वडील अनिरूद्ध विश्‍वकर्मा यांच्‍या देखरेखीखाली तयार करण्‍यात आली आहे. ही कढई घडवायला १५ ते २० कारागिरांची मदत घेण्‍यात आली. हे आव्‍हानात्‍मक कार्य करायला जवळपास एक महिन्‍याचा कालावधी लागतो. परंतु, विश्‍वकर्मा पिता-पुत्र आणि कारागीर यांची कौशल्‍यबुद्धी, मेहनत, रामभक्‍ती यांच्‍या जोरावर हे कार्य एक आठवड्यातच पूर्ण झाले आहे.

हेही वाचा >> Ram Mandir Ayodhya Inauguration Live: “प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या थेट प्रक्षेपणावर निर्बंध घालता येणार नाहीत”, सर्वोच्च न्यायालयाचे तामिळनाडू सरकारला आदेश!

‘कार सेवा ते पाक सेवा’

‘मी प्रभू श्रीरामांचा भक्‍त असून वयाच्‍या २२ व्‍या वर्षी ‘कार सेवा’ केली होती. आता अयोध्‍येत राममंदिर साकार होत असताना श्रीरामाच्‍या चरणी ‘पाक सेवा’ देण्‍याच्‍या उद्देशाने या उपक्रमाला ‘कार सेवा ते पाक सेवा’ असे नाव देण्‍यात आले आहे. ‘हनुमान’ कढई अयोध्‍येत पोहोचल्‍यानंतर येत्‍या, २६ जानेवारीनंतर तेथे ७ हजार किलो ‘श्रीराम शिरा’ तयार केला जाणार आहे. हा देखील एक विश्‍वविक्रम ठरणार असून तो श्रीराम मंदिर न्‍यासच्‍या नावे नोंदवला जाईल. त्‍यानंतर ही ‘हनुमान’ कढई श्रीराम चरणी अर्पण केली जाणार आहे, अशी प्रतिक्रिया विष्‍णू मनोहर यांनी काही दिवसांपूर्वी दिली होती.