अमरावती : अमरावती‎मधील एका राष्ट्रीयकृत बँकेत सहायक‎ व्यवस्थापक तथा स्थापत्य अभियंता‎ पदावर कार्यरत महिला‎ अधिकाऱ्याला कंत्राटदार कंपनीच्या‎ प्रतिनिधीने मोबाईलवर आक्षेपार्ह सात ‘व्हॉइस‎ मेसेज’ पाठवले. या प्रकारामुळे‎ महिलेला प्रचंड मानसिक त्रास‎ झाला असून, या प्रकरणाची महिला‎ अधिकाऱ्याने शहरातील कोतवाली पोलिसांत‎ तक्रार दाखल केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

पोलिसांनी संबंधित कंत्राटदार‎ कंपनीच्या प्रतिनिधींविरुद्ध‎ विनयभंगाचा गुन्हा दाखल केला‎ आहे.‎ राजेश मिश्रा (रा. ठाणे) असे‎ गुन्हा दाखल झालेल्याचे नाव‎ आहे. तक्रारदार महिला अधिकारी‎ शहरात एका राष्ट्रीयकृत बँकेत‎ नोकरीवर आहे. या बँकेच्या‎ नूतनीकरणाची जबाबदारी‎ तक्रारदार महिला अधिकाऱ्याकडे‎ आहे. दरम्यान, बुलढाणा जिल्ह्यातील एका शाखेच्या इमारत‎ नूतनीकरणाचा कंत्राट ठाणे येथील‎ मनोरमा इंटरप्रायझेस या कंपनीला‎ दिला आहे. या बँकेच्या‎ नुतनीकरणाची जबाबदारीसुद्धा‎ तक्रारदार महिला अधिकाऱ्याकडे‎ आहे. राजेश शर्मा हा ठाण्याच्या‎ याच कंपनीचा प्रतिनिधी म्हणून‎ काम पाहतो. दरम्यान, ७ एप्रिल‎ २०२३ रोजी त्याने महिला‎ अधिकाऱ्याला एक ‘व्‍हाइस मेसेज‎’ पाठवला, त्यामध्ये त्याने म्हटले‎ की, ‘तेरा फोटो देखके मेरा दिल‎ आया है, आय लव्ह यू, एक दिन‎ मेरे साथ खाना खाने के लिए चल’‎ यासह अजूनही अनेक आक्षेपार्ह बाबी त्‍याने‎ नमूद केल्‍या आहेत.

हेही वाचा – “जत्रा शासकीय योजनांची”; प्रत्येक जिल्ह्यात ७५ हजार लाभार्थ्यांना थेट मदतीचे उद्दिष्ट, आज आरंभ

हा‎ संदेश त्याने काही वेळानंतर‎ डिलिट केला, मात्र महिला‎ अधिकाऱ्याने तो संग्रहित करून‎ ठेवला. तसेच त्याच दिवशी‎ राजेश शर्माने महिला‎ अधिकाऱ्याच्या एका परिचित‎ आर्किटेक्टलासुद्धा महिला‎ अधिकाऱ्याच्या बाबतीत अत्‍यंत असभ्‍य भाषेत मोबाईलवर संदेश पाठवला. ‘माझी‎ एकदा त्या महिला अधिकाऱ्यासोबत‎ एकांतात मिटींग लावून द्या, पैसे नाही‎ मिळाले तरीही चालेल.’ असा आक्षेपार्ह उल्लेख त्‍यामध्ये केला‎ आहे. दरम्यान, त्याने असे एकूण सात‎ संदेश पाठवले असून, त्यामधून त्याने‎ संबंधित महिला अधिकाऱ्याचा छळ‎ केला आहे. त्यामुळे महिला‎ अधिकाऱ्याने ही बाब आपल्या‎ वरिष्ठांना सांगून पोलिसांत तक्रार दिली‎ आहे.‎