देवेश गोंडाणे
प्रसूतीदरम्यान एखाद्या गर्भवती महिलेचे बाळ अर्धवटच बाहेर आल्याने डॉक्टरांची होणारी धावपळ, बाळ आणि आई दोघांनाही वाचवण्यासाठी डॉक्टरांच्या प्रयत्नानंतर बाळ आणि आई सुखरूप असण्याचा आनंद आपल्यापैकी अनेकांनी अनुभवला किंवा ऐकला तरी नक्कीच असेल. मात्र, अशीच काहीही घटना रस्त्यावरील मादी श्वानाच्या बाबतीत घडली असेल तर नवल वाटता कामा नये. अपर्णा रेड्डी यांनी दोन दिवसांपासून एका भटक्या मादी श्वानाच्या पोटात अर्धवट बाळ अडकलेले पाहून तिला तत्परतेने रात्री ८ वाजता पशुवैद्यकीय रुग्णालयात आणले. पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या प्राध्यापकांनी या स्थितीचे गांभीर्य ओळखून रात्रीच त्वरित रुग्णालयात धाव घेतली. सर्व तपासण्या करून ‘सिझेरीन’ करण्याचा निर्णय घेतला. मादी श्वानाची अवस्था बिकट होती. परंतु शल्यचिकित्सक डॉ. संदीप आखरे आणि डॉ. गौरी खंते यांनी आपले कौशल्य पणाला लावून उशिरापर्यंत शस्त्रक्रिया करून एकूण सात पिल्लं सुरक्षितपणे जिवंत बाहेर काढली. डॉक्टर आणि रेड्डी यांनी प्राण्यांप्रती असलेल्या मानवी संवेदनशीलतेचा परिचय दिला.

सदर परिसरात राहणाऱ्या अपर्णा रेड्डी या भारतीय रेल्वेमध्ये कार्यरत असून कार्यालयातून परतताना त्यांच्या लक्षात आले की, रस्त्यावरील एक भटकी मादी श्वान गर्भवती असून मागील दोन दिवसांपासून अस्वस्थ आहे. त्यांनी आजूबाजूला चौकशी केली असता कळले की, दोन दिवसांपासून या मादी श्वानाची प्रसूती अडली आहे. एकच पिल्लू अर्धवट बाहेर आलेले आहे. रेड्डी यांना या मादी श्वानाची अवस्था बघवली नाही. त्यामुळे त्यांनी त्वरित आपल्या भाचीच्या मदतीने रात्री आठ वाजताच्या सुमारास अलंकार चौकातील महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या पशुवैद्यक रुग्णालयात आणले.

manipur violence 10 militants killed in encounter with crpf
अन्वयार्थ : अशांत मणिपूर, अस्वस्थ नागालँड
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
stray dogs dead
कांदिवलीमध्ये १४ भटक्या कुत्र्यांचे मृतदेह
Viral Video Shows Pet Dog Help Her Owner
मैं हूँ ना…! मालकिणीला मदत करण्यासाठी श्वानाची धडपड; काठी काढण्यासाठी मारली उडी अन्… पाहा VIRAL VIDEO
wild animals adoption scheme
मुंबई: राष्ट्रीय उद्यानातील वाघ, बिबट्या पालकांच्या प्रतीक्षेत
Leopard's Viral Video
‘नशीब चांगलं असलं की मृत्यूही मागे फिरतो…’ श्वानावर बिबट्याचा क्रूर हल्ला.. पण, पुढे जे घडलं; VIDEO पाहून उडेल थरकाप
इयन बोथम आणि मर्व्ह ह्यूज
मैदानावरच्या हाडवैरीने वाचवला मगरींच्या तावडीतून जीव; इयन बोथम यांनी सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
Ashwini Jagtap statement during Devendra Fadnavis meeting in Kalewadi for Shankar Jagtap campaign
चिंचवड: वाघ गेला, ही वाघीण पिल्लांना एकटं पडू देणार नाही; आमदार आश्विनी जगताप कुणाला उद्देशून म्हणाल्या?

महाविद्यालयाच्या प्राध्यापकांनी या स्थितीचे गांभीर्य ओळखून रात्रीच त्वरित रुग्णालयात धाव घेतली आणि तपासण्या करून सिझेरीन करण्याचा निर्णय घेतला. बिकट अवस्थेत असलेल्या मादी श्वानावर शल्यचिकित्सक डॉ. संदीप आखरे आणि डॉ. गौरी खंते यांच्या चमूने कौशल्य पणाला लावून उशिरापर्यंत शस्त्रक्रिया करून एकूण सात पिल्लं सुरक्षितपणे जिवंत बाहेर काढली. मादी श्वान आणि पिल्लांची प्रकृती सध्या स्थिर असून ते रुग्णालयात देखरेखीखाली आहेत. माफसूचे डॉ. लिमसे यांनीही औषधांची मदत केली. शस्त्रक्रियेदरम्यान डॉ. रामप्रसाद मंदाडे, डॉ. सद्दाम हुसेन, डॉ. पायघन, डॉ. राहुल धोंगडे, डॉ. वरद धूत, डॉ. काळे आणि निहाल शेख या महाविद्यालयातील पदव्युत्तरच्या विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.