लोकसत्ता टीम

नागपूर : अंमलीपदार्थ तस्करीत अनेक वर्षांपासून सक्रीय असलेल्या महिलेला जरीपटका पोलिसांनी पकडले. मिसाळ ले-आउट येथील तिच्या राहत्या घरी धाड मारून रंगेहात अटक केली. ३६ लाख २८ हजार रुपये किंमतीचे अंमली पदार्थ जप्त केले. नागपुरात अलिकडच्या काळातील ही सर्वात मोठी कारवाई मानली जाते. या कारवाईमुळे शहरात प्रचंड खळबळ उडाली. या महिलेने अंमलीपदार्थ कुठून आणले आणि कुणाला देणार होती, याबाबत तिने मौन बाळगले आहे.

cyber fraudsters, Eight people arrested ,
सायबर फसवणूक करणाऱ्यांना मदत केल्याप्रकरणी आठ जणांना अटक
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Mangalsutra thief arrested thane, Mangalsutra thief,
ठाणे : महिलेला ढकलून मंगळसूत्र चोरणारा अटकेत
pimpri chinchwad cyber police busted gang operating through China, Nepal crime news
चीन, नेपाळमधून सायबर फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
Bogus woman doctor arrested in Gowandi
गोवंडीत बोगस महिला डॉक्टरला अटक
Four people from Dombivli arrested, Kalyan girl selling,
कल्याणमध्ये दीड महिन्याच्या बालिकेची विक्री करणाऱ्या डोंबिवलीतील चार जणांना अटक
300 crore extortion from female officer on fear of involvement in embezzlement Mumbai print news
३०० कोटींच्या गैरव्यवहारातील सहभागाची भीती दाखवून महिला अधिकाऱ्याकडून खंडणी उकळली; चौघांविरोधात गुन्हा

संजना (काल्पनिक नाव) असे त्या महिलेचे नाव आहे. ती ३५ वर्षांची असून ती पतीपासून वेगळी राहते. ती किरायाच्या घरात राहते. ती मागील अनेक वर्षांपासून अंमलीपदार्थ तस्करीत लिप्त आहे. त्यामुळेच ती दर वेळी खोली बदलविते. तिचे ठरलेले ग्राहक आहेत. सहज उपलब्ध होत असल्याने अल्पवयीन मुले-मुली आणि युवक-युवती नशेच्या आहारी असल्याची चर्चा आहे. काही दिवसांपूर्वी ती मैत्रिणींकडून देहव्यापार करवून घेत होती. तिच्या घरात आंबटशौकीन ग्राहकांची गर्दी वाढली होती. त्याममुळे शेजाऱ्यांच्या तक्रारीवरून अलिकडेच तिच्या देहव्यापाराच्या अड्ड्यावर कारवाई करण्यात आली होती. संजना एमडी तस्करीत सक्रीय असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. खात्री लायक माहिती असल्याने पोलिसांनी तिच्या घराभोवती सापळा रचला आणि धाड मारली.

आणखी वाचा-संतापजनक! अल्पवयीन मुलीवर प्रियकरासह ७ जणांचा बलात्कार

घराच्या झडती घेतली असता किचन रुममधील एक डब्यात ३६ लाख २८ हजार रुपये किंमतीचे ३६५ ग्रॅम एमडी पावर मिळून आला. तिच्या विरूध्द गुन्हा नोंदवून न्यायालयात उपस्थित केले. न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली. तपासात तिने एमडी पावरडर कुठून आणले आणि कुणाला देणार होती, याबाबत माहिती दिली नाही. पोलीस तपासात ती सहकार्य करीत नाही. डोक दुखते असेच ती सांगत आहे. गुरूवारी तिला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. दरम्यान तिच्या मोबाईल सीडीआर काढल्यानंतर अनेक रहस्य उलगडेल.