नागपूर : नागपूर वनविभागाच्या रामटेक वन परिक्षेत्रातील कांद्री मनसर-जबलपूर महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत मादी बिबट्याचा मृत्यू झाला. पेंच व्याघ्र प्रकल्प परिसर घटनास्थळाजवळ आहे. त्यामुळे महामार्ग ओलांडून पलीकडे जात असताना बिबट्याचा अपघात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

महामार्ग ओलांडत असताना अज्ञात वाहनाने बिबट्याच्या जबड्याला धडक दिली. त्यामुळे गंभीर जखमी झालेल्या बिबट्याचा जागीच मृत्यू झाला. माहिती मिळताच रामटेक वनपरिक्षेत्र अधिकारी अनिल भगत व वन कर्मचाऱ्यांचे पथक घटनास्थळी पोहोचले. पंचनामा केल्यानंतर राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकरणाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार मृत बिबट्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. उपवनसंरक्षक डॉ. भरतसिंह हाडा यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी भगत, क्षेत्र सहाय्यक गोडी मेश्राम, गोमासे व पथक पुढील तपास करीत आहेत.

हेही वाचा – स्वामी तिन्ही जगाचा… आईला निरोप देताना नाना पटोले ढसाढसा रडले…

शिकार, अधिवास नष्ट होणे, संघर्ष यातून होणाऱ्या बिबट्यांच्या मृत्यूसाठी आणखी एक गोष्ट कारणीभूत ठरत आहे. भरधाव वाहनाच्या धडकेत होणाऱ्या अपघाताच्या रुपाने एक नवा धोका त्यांना निर्माण झाला आहे. भारतीय वन्यजीव संरक्षण संस्थेने (डब्ल्यूपीएसआय-वाईल्डलाइफ प्रोटेक्शन सोसायटी ऑफ इंडिया) एकत्रित केलेल्या माहितीनुसार २०१० ते २०१९ पर्यंत गेल्या दहा वर्षांत रेल्वे आणि रस्ते अपघातात बिबट्यांच्या मृत्यूत २७८ टक्क्यांनी वाढ झाली आहे. २०१९ मध्ये भारतात ८३ बिबट्यांचा मृत्यू हा रेल्वे आणि रस्ते अपघातात झाला आहे. गेल्या दोन-तीन दशकांत रस्ते, रेल्वे, वीज आणि दळणवळणाच्या भौतिक पायाभूत सुविधा प्रचंड प्रमाणात वाढल्या आहेत. यातील ज्या सुविधा या पर्यावरण दृष्ट्या संवेदनशील भागातून जातात, तेथे धोका निर्माण करतात. येथे वन्यजीव अधिवासांचे तुकडेच होत नाहीत, तर वाहनांच्या धडकेत वन्यजीवांच्या मृत्यूदेखील होतो.

हेही वाचा – सौर पॅनेलच्या कचऱ्याचा प्रश्न ऐरणीवर, उत्तर प्रदेशातील शेतकऱ्याच्या याचिकेनंतर ‘एनजीटी’ची केंद्राला नोटीस

केंद्रीय वन्यजीव मंडळाने एकट्या २०१९ मध्ये ९० टक्क्यांहून अधिक रेषीय पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी (रस्ते, रेल्वे, वीज वाहिन्या आदी) पर्यावरण मंजुरी जाहीर केली. ज्यामुळे बिबट्यासह सर्वच वन्यजीवांचे भविष्य धोक्यात आले आहे. अलीकडच्या काळात वाहनांच्या धडकेत त्यांच्या मृत्यूचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. प्रामुख्याने महाराष्ट्रात २०२१च्या सुरुवातीच्या चार-पाच महिन्यांत झालेल्या ८७ बिबट्यांच्या मृत्यूपैकी ३३ मृत्यू हे रस्ते अपघातात झाले आहेत.