नागपूर : शालेय शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेल्या शिक्षक भारती संघटनेने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या विधिसभा निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली आहे. नागपूर येथील आमदार निवासच्या सभागृहात शनिवारी शिक्षक भारतीची बैठक झाली. अध्यक्षस्थानी शिक्षक आमदार कपिल पाटील होते. याप्रसंगी नितीन वैदय, अतुल देशमुख, राजेन्द्र झाडे, संजय खेडिकर, नवनाथ गेंद, किशोर वरभे, भाऊराव पत्रे, सपन नेहरोत्रा, उमेश शिंगनजुडे उपस्थित होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> नागपूर : रस्त्यांवर डांबरी ठिगळ, वाहनधारकांची कसरत, निकृष्ट कामांमुळे पुन्हा खड्डे

विद्यार्थ्यांच्या फंडातील कोटीपेक्षा जास्त निधी पडून आहे. गरजू विद्यार्थ्यांसाठी त्याचा उपयोग होत नाही. याचा वापर इतर कामासाठी न करता तो फक्त विद्यार्थ्यांसाठीच वापर करावा, विद्यार्थ्यांचे वसतीगृह अद्ययावत करावे, विद्यार्थिनीसाठी एकच वसतिगृह असून सध्या मोठ्या संख्येने मुली शिकायला येतात. परंतु, वसतिगृहाअभावी विद्यार्थिनीना शिकता येत नाही. त्यामुळे मुलींचे नवीन वसतिगृह उभारावे. तसेच विद्यार्थ्यांसाठी ग्रंथालयाची उत्तम व्यवस्था व्हावी. बी.ए., बी.एसस्सी., बी. कॉम.साठी सत्रांत परीक्षा पद्धतीची गरज नाही. त्याऐवजी वार्षिक परीक्षा पद्धती सुरू करावी, विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन शुल्क नियोजन करावे. विद्यार्थ्यांना पायाभूत सर्व सोयी-सुविधा देण्यात याव्या. अशा विविध विषयांवर यावेळी चर्चा करण्यात आली असून या विषयांवर शिक्षक भारती निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे सांगण्यात आले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Field of school education teacher bharti vidyapith vidhisabha election background ysh