लोकसत्ता टीम

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बुलढाणा: जिल्ह्यात जेमतेम ५१ पोलीस जागांसाठी आज रविवारी तब्बल ५७० परिक्षार्थींनी लेखी परीक्षा दिली. बुलढाण्यातील शारदा व एडेड माध्यमिक शाळेत असलेल्या केंद्रात आज सकाळी ११ ते दुपारी १२.३० वाजेदरम्यान कडक पोलीस बंदोबस्तात लेखी परीक्षा पार पडली.

५१ पदांसाठी तब्बल ४४४८ युवकांनी अर्ज केले होते. छाननीत शेकडो युवक गळाले. ३ ते १० जानेवारी दरम्यान मैदानी चाचण्या पार पडल्या होत्या. अडीच हजार उमेदवारांनी यात जोर लावला. अंतिम परीक्षेसाठी ५७० उमेदवारांना संधी मिळाली. आता यातील ५१ भाग्यवान कोण ठरतात आणि कोणाचे पोलीस होण्याचे स्वप्न पूर्ण होते याचा निकाल लवकरच लागणार आहे. या निकालाची ५७० उमेदवार व त्यांच्या परिवाराला प्रतीक्षा लागून आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fifty six hundred candidates examination for fifty one police posts scm 61 mrj