चंद्रपूर : सावली तालुक्यातील बोरमाळा, चेक विरखल आणि वाघोलीबुटी या परिसरात गेल्या काही महिन्यांपासून वाघाने धुमाकूळ घालून चार जणांना ठार केले आहे. त्यामुळे नागरिकांनी वनविभागावर तीव्र रोष व्यक्त करून वाघाला जेरबंद करण्याची मागणी गावकऱ्यांनी लावून धरली. दरम्यान नरभक्षक वाघाला जेरबंद करण्यासाठी वनिवभागाने या परिसरात पन्नास ट्रॅप कॅमेरे, पाच पिंजरे आणि शंभर वनकर्मचारी तैनात करण्यात आले आहे. 

हेही वाचा >>> वर्धा : रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाचे; तीन सुपर फास्ट गाड्यांचा थांबा मंजूर

gondia tiger latest news in marathi
वाघाच्या बछड्याच्या मृत्यूचे खरे कारण आले समोर, गोंदिया वन विभागाच्या…
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
tiger killed laborer harvesting bamboo in Ballarpur forest
चंद्रपूर : वाघाच्या हल्ल्यात मजूर ठार; मृतदेहाजवळ सहा तास ठिय्या…
gondia tiger death loksatta
गोंदिया : ‘टी १४ वाघिनी’च्या बछड्याच्या मृत्यू, ‘इन्फेक्शन’, निष्काळजीपणा की…
Tiger death , Kohka-Bhanpur route, tiger gondia ,
राज्यात वाघांच्या मृत्यूचे सत्र! कॉरिडॉरमध्ये वाघाचा मृत्यू
avian flu transmission to humans
विश्लेषण : ‘एव्हियन इन्फ्लुएंझा’ (एच५एन१) माणसांसह वाघांनाही धोकादायक? 
accident on flyover in Nashik, Four people died accident Nashik,
नाशिकमध्ये उड्डाणपुलावरील अपघातात पाच जण मृत्युमुखी, १३ जखमी
tigers missing tipeshwar wildlife sanctuary
टिपेश्वर अभयारण्यातील दोन वाघ बेपत्ता?

सावली तालुक्यात वाघाने धुमाकूळ घालून चार जणांचा बळी घेतला आहे. तेव्हापासून वाघाला जेरबंद करण्याची मागणी करण्यात येत होती. ३० मार्चला बोरमाळा येथील हर्षल काळमेघे हा चार वर्षीय बालक घराशेजारी शौचाला बसला होता. तेव्हाच वाघाने त्याला उचलून नेत ठार केले. १८ एप्रिल रोजी चेक विरखल येथील मंदाबाई सिडाम या महिलेवरही वाघाने हल्ला करून ठार केले. तसेच २६ एप्रिल रोजी ममता बोदलकर या वृद्ध महिलेसही वाघाने ठार केले. या घटना ताज्या असतानाच उपवन क्षेत्र व्याहाडखुर्द अंतर्गत वाघोलीवडी येथील प्रेमिला रोहनकर हिच्यावरही वाघाने हल्ला केला. सातत्याने वाघाचे हल्ले वाढत असल्याने संतप्त झालेल्या नागरिकांनी मृतदेह न उचलण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे परिस्थिती चिघळण्याच्या मार्गावर आली होती. दरम्यान गावकऱ्यांचा तीव्र रोष बघता  वनविभागाने नरभक्षक वाघाला जेरबंद करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर मृतदेह उचलण्यात आला. वाघाला जेरबंद करण्यासाठी सावली परिसरात वनविभागाने ५० ट्रॅप कॅमेरे, ५ पिंजरे आणि शंभर वनकर्मचारी तैनात करण्यात आले आहे. वाघाच्या हालचालींवर वनविभाग बारीक लक्ष ठेवून असून लवकरच वाघाला जेरबंद करण्यात येईल असा विश्वास वनाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

Story img Loader