यवतमाळ : ‘त्या’ दोघी मैत्रीणी महाविद्यालय सुटल्यावर सहज बगिच्यात गेल्या. पण तिथे त्यांच्यात एकाच बॉयफ्रेंडवरून वाद उफाळला. त्यामुळे त्यांच्यात जुंपली आणि एकमेकींना अश्लील शिवीगाळ करीत झालेली त्यांच्यातील फ्रिस्टाईल चांगलीच व्हायरल झाली. एका बॉयफ्रेंडसाठी दोन मैत्रिणींमध्ये झालेला हा वाद वणी शहरात चांगलाच चर्चेत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वणी येथील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात २५ फेब्रुवारीला दुपारी महाविद्यालय सुटल्यानंतर दोन मैत्रिणी विरंगुळा म्हणून गेल्या. तेथे गेल्यानंतर एका मुलावरून त्यांच्यात वाद सुरू झाला. या वादाचे पर्यावसन थेट हाणामारीत झाले. दोघींनीही एकमेकींना धक्काबुक्की करून लाथांनी मारहाण करायला लागल्या. एकमेकींचे केस ओढून अश्लील भाषेत शिवीगाळ करायला लागल्या. काही मैत्रिणी या दोघींमधील वाद सुटावा म्हणून ‘रिया, रिया’ असे म्हणतानाही ऐकायला येते. एकीने दुसरीचा मोबाईल फोनही जोरात आपटल्याने फुटला. तेव्हा तिथे उपस्थित काही मुलं, मुली, ‘मोबाईल फुटला न तिचा, आता भरून देईल थे, ये व्हिडिओ मले पाठवजो’, असे संवाद करीत आहेत.

blob:https://www.loksatta.com/de2b3105-f163-4134-8b57-c24e21b425ed
घटनेचा व्हिडिओ

हेही वाचा – राजकीय धमाका : “लोकसभा निवडणुकीत स्थानिक उमेदवार द्या, अन्यथा…” वर्ध्यात महाविकास आघाडीच्या नेत्यांचा इशारा

हेही वाचा – होळी सणावर महागाईचा भस्मासूर; पिचकारी, रंग, गुलालाच्या दरात ३० टक्क्यांनी वाढ, खरेदीदारांमध्ये निरुत्साह

अनेकांनी या फ्रिस्टाईलचे मोबाईलमध्ये चित्रीकरण केले. अखेर उद्यानाच्या सुरक्षा रक्षकाने या दोघींनाही उद्यानाबाहेर हाकलून लावले. हा वाद एका बॉयफ्रेंडवरून झाल्याची चर्चा आहे. मात्र, याची कोठेही तक्रार करण्यात आली नाही. इतका वाद होऊनही त्या दोन तरुणी दुसऱ्यादिवशीही त्याच उद्यानात गेल्या होत्या. तेव्हा तेथील सुरक्षा रक्षकाने त्यांच्याकडून भांडणार नाही, अशी हमी घेतल्यानंतरच त्यांना आत प्रवेश दिल्याचे सांगण्यात येते.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fight among girls over boyfriend in wani nrp 78 ssb