एका तरुणीचे दोन तरुणांवर प्रेम जडले. दोघांनीही तिला व्हॅलेंटाईन आठवड्यात प्रेयसीला ‘टेडी’ गिफ्ट देण्याचे ठरवले. तिला अचानक भेटून आश्चर्यचकित करण्याची योजना एका प्रियकराने आखली तर दुसऱ्या प्रियकराने तिला वेळ घेऊन भेटायचे ठरवले. दोघेही प्रियकर एकाच वेळी ‘टेडी’ घेऊन तिला भेटायला आले आणि घोळ झाला. ‘ती माझीच प्रेयसी… माझे तिच्यावर खरे प्रेम’ असा दावा करत दोघांमध्ये तुफान हाणामारी झाली. एकाने दुसऱ्याचे विटेने डोके फोडून गंभीर जखमी केले.
हेही वाचा >>> नागपूर : पोलिसांच्या भीतीपोटी आरोपीची इमारतीवरून उडी, नातेवाईकांनी केला वेगळाच आरोप
एका प्रियकरावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर दुसऱ्यावर गुन्हा दाखल करून त्याला पोलिसांनी अटक केली. ही घटना वाठोडा पोलीस ठाण्याअंतर्गत उघडकीस आली. अभय (२०) असे जखमीचे नाव आहे तर रवी (२२) असे आरोपीचे नाव आहे. नागेश्वर नगर येथील रहिवासी रवी आणि अभय हे मूळचे मध्यप्रदेशातील आहेत. कामाच्या शोधात नागपुरात आले. सध्या ते कंपनीत काम करतात. मागील अनेक वर्षांपासून ते वाठोडा पोलीस ठाण्याअंतर्गत राहतात. परिसरात राहणारी २१ वर्षीय स्विटी (काल्पनिक नाव) पदवीचे शिक्षण घेते. महाविद्यालयात ये-जा करताना तिची अभयशी मैत्री झाली. तर वस्तीजवळ राहणाऱ्या रविशीही मैत्री झाली. दोघेही तिच्यावर प्रेम करू लागले.
हेही वाचा >>> नागपूर : चिमुकलीने मच्छर मारण्याच्या औषधाची बाटली तोंडात घातली आणि….
१४ फेब्रुवारी ‘व्हॅलेंटाईन डे’च्या पर्वावर तिला मोठी भेट देण्याची योजना दोघांनीही आखली. दोघेही एकाच वेळी स्विटीच्या घरी पोहचले. त्यामुळे स्विटीचीही पंचाईत झाली. दोघांनाही एकमेकांबाबत माहिती झाली. त्यानंतर अभयने शुक्रवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास रवीला निर्जन स्थळी बोलावले. स्विटीवरून त्यांच्यात वाद झाला. वाद विकोपाला जाताच अभयने शिवीगाळ करून रवीच्या डोक्यावर वीट मारली. रवी रक्तबंबाळ झाला. त्याला मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले. उपचारानंतर त्याला सुटी देण्यात आली. याप्रकरणी वाठोडा पोलिसांनी गुन्हा नोंदवून अभयला अटक केली.