वाशीम : अंमली पदार्थ नियंत्रण विभागाचे तत्कालीन मुंबई विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या अनुसूचित जातीच्या दाखल्यावर आक्षेप घेऊन, जातीवाचक टिप्पणी केल्याप्रकरणी वाशीम जिल्हा न्यायालयाने राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री नवाब मलिक यांच्या विरोधात ‘अॅट्रॉसिटी’अंतर्गत गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहे.
हेही वाचा… नागपूर: शिकवणी वर्गांकडून शिष्यवृत्ती, प्रवेश परीक्षांचे आमिष दाखवून पालकांची लूट
समीर वानखेडे यांचे चुलत बंधू संजय वानखेडे यांनी वाशीम न्यायालयात या प्रकरणी याचिका दाखल केली होती. मात्र, समीर वानखेडे यांनी स्वतः याचिका दाखल करावी, असे निर्देश न्यायालयाने दिले होते. त्यानंतर समीर वानखेडे यांनी २४ ऑगस्ट रोजी स्वतः वाशीम येथे येऊन याचिका दाखल केली होती. त्यावर १५ नोव्हेंबर रोजी सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने मलिक यांच्या विरोधात ‘अॅट्रॉसिटी’ अन्वये गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. मलिक सध्या तुरुंगात आहेत. त्यांच्याकडून जामिनासाठी प्रयत्न केले जात असतानाच आता वाशीम जिल्हा न्यायालयाच्या या आदेशामुळे त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची चिन्हे आहे.