नागपूर : अंबाझरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन पाडल्याप्रकरणी गरुडा ॲम्युझमेंट पार्क या कंपनीच्या संचालकाविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे आदेश प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी, नागपूर यांनी दिले.

अंबाझरी तलावाशेजारील डॉ. आंबेडकर सांस्कृतिक भवन पाडल्याप्रकरणी संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यासाठी डॉ. आंबेडकर स्मारक बचाव कृती समितीचे सदस्य राजेश महादेव गजघाटे यांनी याचिका दाखल केली होती. न्यायालयाने सुनावणीअंती मे. गरुडा ॲम्युझमेंट पार्क लि.चे संचालक नरेंद्र जिचकार, प्रवीण जैन यांच्यासह चौघांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे आदेश मंगळवारी दिले. तसेच या प्रकरणाचा तपास करून अहवाल सादर करण्याचे आदेश अंबाझरी पोलिसांनी दिले. मात्र, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक आणि प्रादेशिक संचालक यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची विनंती नाकारण्यात आली.

How Files Help police to Solved Murder Mystery
Flies Helped Police : पोलिसांनी उडत्या माश्यांच्या मदतीने कसा लावला १९ वर्षीय आरोपीने केलेल्या हत्येचा छडा?
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
News About Salman Khan
Salman Khan Threat : सलमान खानला धमकी देणाऱ्या तरुणाला ‘या’ राज्यातून करण्यात आली अटक, ५ कोटींची मागितली खंडणी
kalyan Dombivli municipal corporation
डोंबिवलीतील कोपरमध्ये स्थगिती आदेश देऊनही बेकायदा बांधकामाची उभारणी सुरूच; शासन, कडोंमपाचे आदेश बांधकामधारकांकडून दुर्लक्षित
Over 150 prisoners in the state will be released from jail
राज्यातील दीडशेवर कैद्यांची होणार कारागृहातून सुटका; नागपूर आणि पुण्यातील…
man murdered colleague over dispute on food cooking
जेवण बनवण्यावरून वाद; लोखंडी रॉडनी ११ घाव घालून केली हत्या, पिंपरीतील घटना
Anganwadi workers murder case in Ahilyanagar Notice of action to Anganwadi workers
‘सुरक्षेची भाऊबीज ओवाळणी’ ऐवजी अंगणवाडी सेविकांना कारवाईची नोटीस
police registered case against restaurant waiter for giving impure water
डोंबिवली पलावातील हॉलमधील सेवकावर अशुध्द पाणी पिण्यास दिले म्हणून गुन्हा

हेही वाचा – चंद्रपूर : राजकारणातील एकमेकांचे प्रतिस्पर्धी एकाच मंचावर, धानोरकर, अहिर व धोटे यांच्या हास्याचे फवारे, चर्चा रंगली

आंबेडकर भवन पडणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक बचाव समिती १०५ दिवसांपासून आंदोलन करीत आहे. अंबाझरी पोलिसांकडे अनेकदा तक्रारदेखील करण्यात आली. परंतु पोलिसांनी अद्याप गुन्हा दाखल केला नाही. त्यामुळे समितीच्या वतीने गजघाटे यांनी न्यायालयात दाद मागितली.

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने (एमटीडीसी) अंबाझरी उद्यान आणि स्मारकाची ४४ एकर जमीन गरुडा कंपनीला ३० वर्षांसाठी लीजवर दिली आहे. या कंपनीने कोणाचीही परवानगी न घेता येथील झाडे कापली आणि इमारत पाडल्याचा आरोप आहे. या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश राज्याचे अतिरिक्त मुख्य आयुक्त यांनी नागपूर विभागीय आयुक्तांना दिले आहेत. त्याचा तपास अद्याप झालेला नाही. आपण झाडे कापली नाहीत, आंबेडकर भवन पाडले नाही. भवन आणि ९० ते १०० झाडांची पडझड वादळाने झाल्याचा दावा या कंपनीचे संचालक नरेंद्र जिचकार आणि इतरांनी केला आहे.

हेही वाचा – गोंदिया : रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाचे : २० गाड्या रद्द, ट्रेनच्या विलंबाची समस्या डिसेंबरपर्यंत कायम राहणार

दरम्यान, उद्ध्वस्त भवनाच्या ढिगाऱ्यावर डॉ. आंबेडकर जयंती साजरी करता यावी म्हणून आंदोलक उच्च न्यायालयात गेले होते. न्यायालयाच्या परवानगीने येथे जयंती साजरी करण्यात आली. आता भवन पाडणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.