नागपूर: राज्यात नुकत्याच झालेल्या तलाठीपदाच्या परीक्षेसाठी नमुना उत्तरपत्रिका जारी करण्यात आली असून, येत्या रविवारपर्यंत त्यावर हरकती मागविण्यात आल्या आहेत. त्यानंतर, आठवड्याभरात हरकतीचे संकलन करून ३१ ऑक्टोबरपर्यंत उत्तरपत्रिका पुन्हा अंतिम करण्यात येऊन नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात उमेदवारांना त्याआधारे आपले गुण कळू शकणार आहेत. मात्र, अंतिम गणवत्ता यादी १५ डिसेंबरपर्यंत जाहीर करण्यात येईल. ही यादी जिल्हाधिकारी कार्यालयात जाहीर करण्यात येणार आहे.
राज्यात ४ हजार ४६६ तलाठीपदांसाठी तब्बल ८ लाख ५६ हजार जणांनी परीक्षा दिली होती. ही परीक्षा ५७ टप्प्यात घेण्यात आली. त्यानंतर प्रत्येक टप्यात घेण्यात आलेल्या प्रनपत्रिकेची नमुना उत्तरपत्रिका जाहीर करण्यात आली आहे. आठवड्याभरात हरकतीचे संकलन करून ३१ ऑक्टोबरपर्यंत उत्तरपत्रिका पुन्हा अंतिम करण्यात येऊन नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात उमेदवारांना त्याआधारे आपले गुण कळू शकणार आहेत. मात्र, अंतिम गणवत्ता यादी १५ डिसेंबरपर्यंत जाहीर करण्यात येईल. त्यामुळे नियुक्तीपत्र जानेवारी महिन्यात भेटण्याची शक्यता आहे.