नागपूर : केंद्र सरकारच्या योजनांमध्ये पैसे गुंतविल्यास मोठा नफा मिळवून देण्याच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या ठगबाज मीरा फडणीस हिला यवतमाळ पोलिसांनी अटक केली होती. फडणीस हिच्याविरुद्ध नागपुरातही अनेक तक्रारी होत्या. त्यामुळे बुधवारी सायंकाळी फडणीस हिला नागपूर पोलिसांनी ताब्यात घेतले.

जवळपास ६ महिन्यांपूर्वीच आर्थिक गुन्हे शाखेत तिच्याविरुद्ध तक्रारी होत्या. मात्र, एका राजकीय नेत्याचा वरदहस्त असल्यामु‌ळे मीरा फडणीस हिला नागपूर पोलीस अटक करीत नव्हते. मात्र, यवतमाळ पोलिसांनी अटक केल्यानंतरच नागपूर पोलिसांनी कारागृहातून ‘प्रॉडक्शन वॉरंट’वर तिचा ताबा घेतला आहे.

ATM money theft pune, thief caught pune,
पुणे : एटीएममधून रोकड चोरणाऱ्या चोरट्याला पकडले; सुरक्षारक्षक, वाहतूक पोलिसांची तत्परता
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Pune Loot, bikers robbed pune, pune crime news,
पुणे : शहरात लुटमारीचे प्रकार वाढीस, दुचाकीस्वार तरुणांना लुटले
life insurance fraud pune marathi news
पुणे: आयुर्विमा पॉलिसीच्या नावाखाली तरुणीची १३ लाखांची फसवणूक
Solapur district bank scam
सोलापूर जिल्हा बँक घोटाळ्याची ३२ तत्कालीन संचालकांवर जबाबदारी, ११०३ कोटी रुपये गैरव्यवहार प्रकरण, ऐन निवडणुकीत निर्णयाने खळबळ
Violence against women increase, conviction rate
महिला अत्याचार वाढले….पण, गुन्ह्यातील दोषसिद्धीचे प्रमाण मात्र……
bombay hc reject builder bail over illegal housing projects
बेकायदा गृहप्रकल्प राबवणाऱ्यांवर कारवाई गरजेची; विकासकांना जामीन नाकारताना उच्च न्यायालयाची टिप्पणी
thane model code of conduct crime loksatta news
आचारसंहिता भरारी पथकाचीच खंडणीखोरी, शेतमालाच्या पैशांवर डल्ला, १३ दिवसांनंतर गुन्हा दाखल

हेही वाचा – गडचिरोलीसाठी भाजपा धक्कातंत्र वापरणार? दुसऱ्याही यादीत नाव नसल्याने इच्छुक अस्वस्थ

उत्तरप्रदेशातील बनारस, लखनऊपासून ते महाराष्ट्रातील यवतमाळ आणि मुंबईपर्यंत नेटवर्क असलेल्या टोळीने विदर्भातील सुमारे ७० जणांना जवळपास ८ कोटी रुपयांनी मिरा आणि तिचा साथिदार अनिरुद्ध होशिंग याने फसवणूक केली. यवतमाळची मूळ रहिवासी असलेल्या मीरा फडणीस हिने सत्तापक्षातील एका बड्या नेत्याची नातेवाईक असल्याचे सांगून अनेक गुंतवणुकदारांना भूरळ घातली. संघाची कार्यकर्ता असल्याचे सांगून अनेकांना तिने पर्यटन विभागात गाड्या भाड्याने देणे आणि रेल्वेत लिनन क्लिनींगच्या कंत्राटाद्वारे मोठ्या कमाईचे आमिष दाखवले. केंद्र सरकारच्या अख्त्यारितील विभागाचे अधिकृत कंत्राट आणि त्यामाध्यमातून उत्पन्न मिळेल या आशेने गुंतवणूकदारांनी कर्ज काढून कोट्यवधी रुपयांची (बँक ट्रांझॅक्शनच्या माध्यमातून) गुंतवणूक केली होती. याप्रकरणी मीरा फडणीस हिचा साथीदार असलेला अनिरुद्ध होशिंग याला नागपूर पोलिसांनी लखनऊ येथून अटक केली.

होशिंग हा स्वयंघोषित पर्यटन विभागाचा अधिकारी बनून लोकांना फसवत होता. होशिंग सध्या नागपूर कारागृहात बंद आहे. परंतु, या प्रकरणातील आमिर शेख, राहुल शर्मा, पूनम मिश्रा आणि मीरा फडणीस अजूनही मोकाटच आहेत. मीरा फडणीस पूर्वी क्रीडा भारतीची प्रांतमंत्री होती. त्याशिवाय समाजातील प्रतिष्ठीत संस्था आणि संघटनांशी तिचा संबंध होता. मीराने तिच्या संपर्कातील लोकांना मुबलक परतावा देणाऱ्या गुंतवणूक योजनेची माहिती दिल्यानंतर लोकांचा तिच्यावर चटकन विश्वास बसला. बेताची आर्थिक स्थिती असलेल्या अनेकांनी प्रलोभनाला बळी पडून कर्ज काढून मीरा फडणीसला पैसा दिला. विशेष म्हणजे हा सर्व व्यवहार तिने बँक ट्रांझॅक्शनच्या माध्यमातून केला. तसेच भारत सरकारची राजमुद्रा वापरून बोगस कागदपत्रे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, अमिताभ बच्चन आणि कंगना राणावत अशी दिग्गजांची नावे वापरून बैठक घेतली जाणार असल्याचे भासवले. नागपुरातील हॉटेल रॅडिसन ब्ल्यू येथे कार्यक्रम पत्रिका वाटप केले. परंतु, आजतागायत कुठल्याही गुंतवणूकदाराला एक रुपया देखील परत मिळालेला नाही. त्यासोबतच मीरा फडणीसने गुंतवणूकदारांकडून विविध बँक खात्यांच्या माध्यमातून पैसे स्वीकारले. यात मीरा फडणीसची मुलगी शर्वरी फडणीस हिच्या बँक खात्यात देखील २१ लाख रुपये जमा करण्यात आले होते.

हेही वाचा – डॉ. सुभाष चौधरी यांना मोठा दिलासा, उच्च न्यायालयाने निलंबनाला दिली तात्पुरती स्थगिती

मीरा फडणीसने केलेल्या आर्थिक फसवणुकीबाबत नागपूर व यवतमाळ येथील आर्थिक गुन्हे शाखेकडे पीडितांनी तक्रार नोंदवली आहे. नागपूर पोलिसांनी आतापर्यंत मीरा फडणीस सापडत नसल्याची पळवाट काढली होती. मात्र, यवतमाळ पोलिसांनी मीराला लगेच अटक करून कारागृहात रवानगी केली. त्यानंतर नागपूर पोलिसांनी मीराला कारागृहातून ताब्यात घेतले.