राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या सात उच्चपदस्थ विभागप्रमुखांकडून लैंगिक छाळाच्या बनावट तक्रारीची भीती दाखवून लाखो रुपयांची खंडणी वसूल करणारे जनसंवाद विभागाचे प्राध्यापक डॉ. धर्मेश धवनकर यांनी कशाप्रकारे फसवणूक करून लाखोंची खंडणी वसूल केल्याची माहिती प्राध्यापकांनी ‘लोकत्ताशी’बोलताना दिली. मी कुलगुरूंच्या फार जवळचा आहे, शिक्षण मंच आणि विद्यापीठातील काही लोक तुम्हांला उच्च पदावर जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करीत आहेत, असे सांगून धवनकर यांनीप्राध्यापकांची फसवणूक केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

धवनकर यांनी आपल्या निकटच्या प्राध्यापकांची फसवणूक करून लाखोंची खंडणी वसूल करण्याच्या प्रकरणाने खळबळ उडाली आहे. यासंदर्भात फसवणूक झालेल्या एका प्राध्यापकांनी त्यांचा अनुभव सांगितला, धवनकर यांनी त्यांना भ्रमणध्वनीवर वारंवार संपर्क साधून भेटायला बोलावले. तुमच्या विरोधात विद्यापीठाकडे लैंगिक छळाची तक्रार झाली असून याची चौकशी करण्यासाठी उच्चस्तरीय चौकशी समिती नियुक्त केली आहे. त्यात मी स्वत: असल्यामुळे आणि कुलगुरूंच्या निकट असल्यामुळे मला हे माहिती झाले. यातून तुम्हाला कसे बाहेर काढता येईल म्हणून प्रयत्न करीत आहे. तुम्हाला पुढे पदोन्नती मिळू नये म्हणून शिक्षण मंचाने तुमच्या विभागातील काही प्राध्यापिकांना हाताशी धरून ही खेळी खेळली. प्रकरण प्रसार माध्यमांकडे प्रकरण जाण्याची शक्यता आहे, असे सांगितले. हे ऐकून संबंधित प्राध्यापकाच्या पायाखाली वाळू सरकली.

हेही वाचा : लैंगिक शोषणाच्या तक्रारीची भीती दाखवत प्राध्यापकांची लूट!; नागपूर विद्यापीठाच्या जनसंपर्क अधिकाऱ्याविरुद्ध तक्रार

दोन दिवसांनी प्राध्यापकांना विभागात बोलावून आपल्या गाडीत बसवले व तुम्ही खूप नशीबवान आहात. माझे जवळचे असल्यामुळे मी मध्यस्थी केली. चौकशी समितीमधला वकील दहा लाख मागत होता. मी त्याला माझे मोठे भाऊ असल्याचे सांगून पाच लाख देण्याचे कबूल केले व स्वत:जवळचे दोन लाखही दिले. नाही तर हिंदी विभागातील अशाच प्रकारचे (पांडेंचे) प्रकरण तुम्हाला माहितीच आहे, असे सांगून प्राध्यापकाकडून पाच लाख मागितले. मात्र, स्वत:वर पूर्ण विश्वास असल्याने त्यांनी या प्रकरणाची चर्चा इतर सहकाऱ्यांशी केली असता त्यांच्यासोबतही असाच प्रकार घडल्याचे त्यांना कळून चुकले. खंडणीखोर धवनकर यांचे प्रकरण समोर आले.

हेही वाचा : गडचिरोली : मंत्री संजय राठोड प्रकरणी न्यायालयीन लढाई सुरूच ठेवणार; चित्रा वाघ यांची स्पष्टोक्ती

धवनकरांवर आधीही झाले आहेत आरोप
डॉ. धवनकर यांनी याआधीही पाकिस्तानला शैक्षणिक सहल घेऊन जाण्याच्या नावावर विद्यार्थ्यांचे पैसे लुबाडल्याचा आरोप होता. यावेळी ते चार वर्षांसाठी निलंबित केले होते. त्यानंतर नजिकच्याच काळात दिल्ली येथे शैक्षणिक सहल घेऊन गेले असताही विद्यार्थ्यांचे पैसे लुबाडल्याचा आरोप झाला होता. यासंदर्भातही चौकशी समिती नेमण्यात आली होती.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Financial fraud pretending to be close to the vice chancellor dr dharmesh dhawankar case university of nagpur tmb 01