नागपूर :  नागपुरात सोमवारी  दंगलखोरांनी पोलिसांवर दगडफेक केली. त्यानंतर जाळपोळ, तोडफोड करीत लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान केले, हे झालेले आर्थिक नुकसान दंगलखोरांकडून वसूल करण्यात येईल. तसेच त्यांची संपत्ती विकून सुद्धा आर्थिक नुकसान भरपाई वसूल केली,  जाईल अशी माहिती   मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर पोलीस आयुक्तालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी औरंगजेबची प्रतीकात्मक कबर जाळली . त्यावर आयत लिहिलेली असल्याची  माहिती कळताच  सायंकाळच्या सुमारास  हंसापुरी, महाल चिटणीस पार्क चौक, भालदारपुरा  परिसरात दंगल घडली.  दंगलखोरांनी शासकीय संपत्तीसह नागरिकांच्या वाहनांची तोडफोड केली जाळपोळ केली आणि दगडफेकीत  मोठे आर्थिक नुकसान केले. या दगडफेकीत तीन पोलीस उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांसह एकूण ४० जण जखमी झाले.

सीसीटीव्ही फुटेज आणि सोशल मीडियावरील व्हिडीओ वरून दंगलखोरांची ओळख पटवण्यात येत आहे आत्तापर्यंत १०४ जणांची ओळख पटली असून ९२ जणांना अटक करण्यात आली. आहे त्यामध्ये १२ विधी संघर्ष ग्रस्त बालकांचा समावेश आहे. अजूनही दंगलखोरांची ओळख पटवणे सुरू असून शेवटच्या दंगलखोरला अटक करण्यात येईल, प्रत्येकावर गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात येईल, असे फडणवीसांनी सांगितले.

दंगल सुनियोजित वाटते. कारण काही दंगलखोरांनी सकाळपासूनच सोशल मीडियावर दंगल घडविण्यास प्रोत्साहन देणाऱ्या पोस्ट, फोटो, व्हिडीओ आणि मजकूर पोस्ट करणे  सुरू केले होते. सायबर पोलिसांच्या माध्यमातून त्यांची ओळख पटवणे सुरू आहे. ६८ जणांची ओळख पटवली असून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे, असेही फडणवीसांनी सांगितले.

Story img Loader