चंद्रपूर: बकरी व शेळी चोरी प्रकरणात तळोधी बाळापूर पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी संशयित आरोपीकडून १५ हजार रूपये घेतले. फिर्यादीसोबत आर्थिक देवाण- घेवाण केल्याने पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी यांनी या दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांना तडकाफडकी निलंबित केल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे. सहायक फौजदार सुरेश पानसे व पोलीस शिपाई मनीष गेडाम अशी निलंबित पोलिसांची नावे आहेत.

तळोधी बा. येथील नवानगर वार्डातील माया बोरकर यांच्या गोठ्यातून दोन बकरे व दोन शेळ्या चोरीला गेल्या. माया बोरकर यांनी याबाबत तक्रार केल्यानंतर सहायक फौजदार सुरेश पानसे व शिपाई मनीष गेडाम यांनी संशयित म्हणून  अश्विन कचरू मेश्राम या युवकाला पोलिस ठाण्यात आणले. त्याला मारहाण करून प्रकरण दडपण्यासाठी त्याच्याकडून १५ हजार रूपये वसूल केले. त्यापैकी पाच हजार रूपये फिर्यादी माया बोरकर यांना रवी मोटघरे या व्यक्तीच्या माध्यमातून दिले. मात्र तिने हे पैसे दुसऱ्याच दिवशी परत केले.

person Absconding arrested, crime branch,
पुणे : खून प्रकरणात सात वर्षे गुंगारा देणारा गजाआड, गुन्हे शाखेची ठाण्यात कारवाई
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
Mumbai High Court, idol immersion, Aarey lakes, Ganesha idols, environmental protection, CPCB guidelines, Mumbai, Van Shakti, public interest litigation
आरेतील तीन तलावांत मूर्ती विसर्जनास बंदी, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची न्यायालयात भूमिका
High Court, CID Investigation, Ritu Malu, Hit and Run, Nagpur Police, Tehsil Sub Inspector Allegations, Police Protection, Medical Examination, CCTV Footage, latest news
रामझुला हिट अँड रन प्रकरणाचा तपास पोलिसांकडून काढला….आता अखेर सीआयडीकडे…
Pune, Bhagyashree Navatke, Economic Offenses Wing, Jalgaon, embezzlement, bhaichand hirachand raisoni, BHR Credit Union, Home Department,
‘बीएचआर’ पतसंस्थेतील गैरव्यवहार प्रकरणात संशयित आरोपीची गृहखात्याकडे तक्रार
A case has been filed against 15 people including an official employee contractor in the case of embezzlement in Malegaon Municipal nashikS
मालेगाव मनपातील अपहार प्रकरणी अधिकारी-कर्मचारी, ठेकेदारासह १५ जणांविरुध्द गुन्हा – लाचलुचपत प्रतिबंधकची कारवाई
Kalyaninagar accident case
कल्याणीनगर अपघात प्रकरण: रक्ताचे नमुने बदलल्या प्रकरणी अगरवाल दाम्पत्य, डॉक्टरांसह इतरांचा जामीन अर्ज फेटाळला
Pune, Sassoon General Hospital, Employee Protest, Collector s Office, Hospital Defamation, Employee Demands, Recruitment Issues
‘ससून’ची बदनामी थांबवा! रुग्णालयाचे कर्मचारी आक्रमक; मोर्चाद्वारे थेट जिल्लाधिकारी कार्यालयावर धडकले

हेही वाचा >>> ऐकलं का?..आता पोलीस देणार भिकाऱ्यांना व्यावसायिक प्रशिक्षण!, नागपुरात नवीन प्रयोग

याप्रकरणाची माहिती सामाजिक कार्यकर्ते अजित सुकारे यांना मिळताच त्यांनी विशेष पोलीस महानिरीक्षक नागपूर तथा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी व ब्रह्मपुरी उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडे तक्रार करून चौकशीची मागणी केली. अश्विन मेश्राम या युवकाला विनाकारण मारहाण करून व बळजबरीने १५ हजार रूपये वसूल केल्याने त्यानेही दोघांविरोधात तक्रार केली. शिवाय, फिर्यादी माया बोरकर यांनीही पुन्हा तक्रार केल्यानंतर सहायक फौजदार सुरेश पानसे व पोलिस शिपाई मनीष गेडाम या दोघांची वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी चौकशी केली.अखेर प्रकरणाचे गांभीर्य लक्षात आल्याने पोलिस अधीक्षक परदेशी यांनी सहायक फौजदार सुरेश पानसे आणि मनीष गेडाम यांना निलंबित केले. या आर्थिक देवाण घेवाण व निलंबनाची पोलीस खात्यात चर्चा आहे.