नागपूर: भाजी विक्रेत्यापासून तर मोठ्या मॉल्समधील अनेक व्यवसायिक दुकानाच्या तर काही लोक वाहनांच्या आणि घराच्या प्रवेशद्वाराबाहेर लिंबू आणि मिरची बांधतात. काही लोक याला अंधश्रद्धा मानत असले तरी यावर अनेकांचा विश्वास आहे. त्यामागे शास्त्र सांगितले जात असल्यामुळे अनेक व्यवसायिक दुकान उघडल्यानंतर आजही पहिल्यांदा हिरवी मिरची आणि लिंबू एका दोरात बांधून ती दुकानाच्या बाहेर प्रवेशद्वारावर लावतात. यामागे नेमके कारण काय आहे.
या संदर्भात काही दुकानदारांशी संवाद साधला असताना त्यांनी सांगितले, दुकान, घर आणि कारमध्ये लिंबू-मिरची लटकवल्याने अनेक समस्या मागे लागत नाहीत. काही लोक आपल्या भरभराटीसाठी आणि विविध प्रकारच्या त्रासांपासून मुक्त होण्यासाठी हे करत असतात. त्याचबरोबर काही लोक वास्तूदोष दूर करण्यासाठी लिंबू आणि मिरचीचा वापर करतात. लिंबू-मिरची लटकवण्यामागचे नेमके कारण नसून ती अंधश्रद्धा आहे असे मानणारे अनेक व्यवसायिक असल्याचे समोर आले आहे. बडकस चौकातील चहा सेंटरचे केशव यांनी सांगितले, दुकान लावले तेव्हापासून सकाळी दुकान उघडले की मिरची लिंबू लावतो. यामुळे व्यवसायात भरभराट होते आणि कोणाची वाईट नजर लागत नाही.
हेही वाचा… अंडी शाकाहारीच, पण? पशुवैद्यकांचा दावा काय, वाचा सविस्तर…
वास्तविक जेव्हा आपण मिरची, लिंबू यांसारख्या गोष्टी डोळ्यांसमोर पाहतो, तेव्हा आपल्याला त्याची चव मनाला जाणवू लागते. यामुळे आपण ते जास्त वेळ पाहू शकत नाही आणि लगेच आपले लक्ष तिथून काढून घेतो आणि त्यामुळे आपल्याला आपल्या कामात लक्ष केंद्रित करण्यास मदत होते. विज्ञानानुसार कोणतीही चांगली वस्तू पाहिल्यानंतर मेंदूच्या पेशी चांगल्या प्रकारे काम करू लागतात आणि मनात सकारात्मकतेचा संचार होतो.
हेही वाचा… नागपूर: उपराजधानीच्या ग्रामीण भागात शिक्षणाचा खेळखंडोबा, ७८ शाळांमध्ये एकही शिक्षक नाही
लिंबू-मिरचीमध्ये कीटकनाशक गुणधर्म असतात, त्या लटकवल्याने आजूबाजूचे वातावरण शुद्ध होते. वास्तुशास्त्रानुसार जेथे लिंबाचे झाड असते, त्याच्या सभोवतालची जागा पूर्णपणे शुद्ध असते. अशा वेळी ज्या घरात लिंबाचे झाड असते, ते घर पूर्ण शुद्ध मानले जाते. प्रत्येक घरात लिंबाचे झाड लावणे शक्य नसते म्हणून लोक घराच्या दारावर लिंबू-मिरची टांगतात. लिंबूमध्ये नकारात्मक ऊर्जा नष्ट करून सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्याची क्षमता असते. त्यामुळे वास्तू दोषही कमी होते असेही बोलले जाते.
हेही वाचा… वर्धा: “१३ जुलैला कुठेही जावू नका”, भाजप प्रदेशाध्यक्षांचे आमदारांना फर्मान; म्हणाले…
याबाबत ज्योतिषाचार्य प्रीती रांजदेकर यांनी सांगितले, दारावर लिंबू-मिरची लटकवण्यामागेही शास्त्र आहे, असे काही लोक मानतात. दुकानाला किंवा घराला वाईट नजर लागू नये यासाठी घरासमोर किंवा दुकानाला हिरवी मिरची आणि लिंबू बांधत असतात.