यवतमाळ : एखाद्याची संपत्ती हडपण्यासाठी कोण काय करेल याचा नेम नाही. एका महिलेने चक्क अविवाहित मृत अभियंत्याची तोतया पत्नी बनून मृत अभियंत्याची संपत्ती हडपण्यासह त्याच्या जागेवर अनुकंपाची नोकरी मिळवण्याचा प्रयत्न केल्याची घटना वणी तालुक्यात उजेडात आली.

एका मृत अविवाहित अभियंत्याची पत्नी असल्याची बतावणी करून अनुकंपावरील नोकरी आणि पैशावर दावा करणाऱ्या या तोतया महिलेचे बिंग अखेर फुटले आहे. खोटे प्रमाणपत्र सादर करून पत्नी असल्याचा दावा करणाऱ्या या महिलेविरुद्ध वणी पोलीस ठाण्यात फसवणुकीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Financial misappropriation case, acquittal ,
आर्थिक गैरव्यवहाराचे प्रकरण : भावना गवळी यांच्या निकटवर्तीयाची दोषमुक्तीची मागणी फेटाळली
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
district court granted valmik karad get 7 days police custody
‘खंडणीच्या आड आल्याने देशमुख यांची हत्या’; युक्तिवादात विशेष तपास पथकाचा संशय
misunderstanding of kidnapping because of girl scream in car
कारमध्ये आरडाओरड करणे आले अंगलट, काय घडले?
Couple Murdered Daughter In Law
Crime News : विष मिसळलेली ताडी दिली अन् दगडाने ठेचून… मुलाने मनाविरुद्ध लग्न केले, सासू-सासऱ्याने सुनेला संपवले
man killed wife due to suspicion of having an immoral relationship
नागपूर : प्रेमविवाहाचा करुण अंत! अनैतिक संबंधाच्या संशयातून पत्नीचा खून
bhosri Balajinagar slum youth and accomplices ransacked womans house
पिंपरी : चपलेने मारल्याचा बदला घेण्यासाठी महिलेच्या घरात घुसून तोडफोड
2 year old girl die while playing due to car accident
नागपूर : दोन वर्षीय चिमुकलीने आईच्या कुशीत सोडला जीव…

मृत अभियंत्याची आई शकुंतला मधुकर कोनप्रतीवार हिच्या तक्रारीवरून पोलिसांनी ही कारवाई केली. रशिदा बेगम सय्यद फकरुद्दीन उर्फ सुप्रिया रंगनाथ रुईकर, असे तोतया महिलेचे नाव आहे. चंद्रशेखर मधुकर कोनप्रतीवार असे मृत अभियंत्याचे नाव आहे. ते मूळचे वणी येथील रहिवासी असून, चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा येथे सार्वजनिक बांधकाम विभागात शाखा अभियंता म्हणून कार्यरत होते.

या दरम्यान, २० जानेवारी २०२२ला त्यांचे हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांनी वारसाला मिळणाऱ्या कायदेशीर लाभासाठी न्यायालयात वारसा प्रमाणपत्राकरिता अर्ज केला. मात्र, त्याचवेळी या प्रकरणात रशिदा बेगम सय्यद फकरुद्दीन उर्फ सुप्रिया रंगनाथ रुईकर या महिलेने उडी घेतली.

चंद्रशेखर यांच्या कुटुंबीयांना दिल्या जाणाऱ्या वारसा प्रमाणपत्रावर रशिदाने आक्षेप घेतला. सध्या ही महिला नागपुरात वास्तव्याला आहे. तत्पूर्वी ती वणी येथे वास्तव्याला होती. सन २००७ मध्ये नागपुरातील गणेश टेकडी मंदिरात चंद्रशेखर सोबत लग्न झाले. त्यानंतर चंद्रशेखरपासून दोन मुले झालीत, असा दावा तिने आक्षेप घेताना केला. चंद्रशेखरच्या मृत्यूनंतर नोकरी व इतर आर्थिक लाभावर तिने दावा केला. यासाठी ती न्यायालयात गेली.

असे फुटले महिलेचे बिंग

चंद्रशेखरच्या कुटुंबीयांच्या माहितीप्रमाणे, ही महिला ही वणीतील रंगारीपुरा येथे एका इसमासोबत २०२० पर्यंत राहत होती. त्या इसमापासून तिला दोन मुले झालीत. या मुलांची प्रसूती वणीतीलच एका खासगी रुग्णालयात झाली. याची नोंद चिखलगाव ग्रामपंचायतीमध्ये होती. ही नोंद चंद्रशेखरच्या कुटुंबीयांनी पुरावा म्हणून सादर केली. शिवाय गणेश टेकडी मंदिर येथे कोणत्याही प्रकारचे लग्न होत नाही व आजपर्यंत कोणतेही लग्न येथे झाले नाही, अशी माहिती मंदिर प्रशासनाने दिली. तसेच ज्या तारखेला लग्न झाल्याचा दावा करण्यात आला, त्या तारखेला चंद्रशेखर हा कर्तव्यावर हजर होते, असे विविध पुरावे त्यांच्या कुटुंबीयांनी सादर केल्याने तोतया पत्नीचे बिंग फुटले.

हेही वाचा : समाजमाध्यमात झालेली ओळख पडली महागात, परिचारिकेला न्यूड क्लिप प्रसारित करण्याची धमकी, खंडणी मागणाऱ्यावर गुन्हा

महिलेचे बिंग फुटताच न्यायालयाने चंद्रशेखरच्या कुटुंबीयांच्या बाजूने निकाल दिला. तसेच तोतया पत्नीवर तत्काळ गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यावरून वणी पोलीस ठाण्यात महिलेविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हे दाखल केले. या प्रकरणाची वणी शहरात चांगलीच चर्चा सुरू आहे.

Story img Loader