नागपूर : नागपूर औद्योगिक वसाहतीतील (एमआयडीसी) एका रंग (पेंट) तयार करणाऱ्या कंपनीला दुपारी आग लागली. या आगीत कंपनीचे मोठे नुकसान झाले आहे. ऑइलमुळे आग अधिक भडकली. आजूबाजूच्या परिसरात धुरामुळे कमचाऱ्यांना त्रास झाला. अग्निशामक दलाचे आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. कंपनी बंद असल्यामुळे मोठी घटना टळली.
हिंगणा एमआयडी इलिजीएंट सुपरप्लास्टो ही ऑईल पेंट तयार करणारी कंपनी आहे. बुधवारी कामगारांना सुट्टी असल्यामुळे कंपनी बंद होती. सकाळी ११ च्या सुमारास कंपनीतून धूर निघत असल्याचे कंपनीसमोर सुरक्षा रक्षकाला दिसले. त्याने लगेलच एमआयडी अग्निशमन विभागाला माहिती दिली. परिसरातील लोक जमा झाले. अग्निशमन विभागाच्या गाड्या येत पर्यंत आगीचे लोळ दिसू लागले होते. आगीत कंपनीतील मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनीनी सांगितले.