लोकसत्ता टीम
नागपूर: पूर्व वर्धमान नगर येथील स्वामी नारायण शाळेजवळ निवासी परिसरातील एका सायकल स्टोअर्स आणि फोमच्या गोदामाला आग लागली असून त्यात कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले.
गुरुवारी रात्री सव्वा दोनच्या सुमारास लागली आग असून अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले आहे. या आगीत शेकडो सायकलीसह साहित्यही यात जळून खाक झाले आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या ६ गाड्या आल्या असून सकाळी संपूर्ण आग आटोक्यात आली होती.
आणखी वाचा-लहान मुलांचा किरकोळ वाद, त्यात मोठ्यांची एन्ट्री अन् शेवटी एकाची हत्या…
परफेक्ट सायकल अँड रेगझिंन स्टोर्सला ही आग लागली आहे. या आगीत शंभर पेक्षा सायकली जाळून खाक झाल्या आहेत. गोदामाच्या आजूबाजूला असलेल्या इमारती आणि घरांचेही यात नुकसान झाले आहे.