लोकसत्ता टीम
वर्धा : जिल्ह्यातील कारंजा घाडगे येथे आज पहाटेच्या सुमारास चार दुकानाला अचानक आग लागली. आगीचे कारण अद्याप कळू शकले नाही. या आगीत जवळपास १० ते २० लाखाचे नुकसान झाले आहे. शहरातील मुख्य मार्केट मधील नगर पंचायतच्या माजी नगरसेवकांच्या मोबाईलच्या दुकानात अचानक आग लागली. दुकानातील संपूर्ण साहित्य जळून खाक झाल्याचे दहा लाखापेक्षा जास्त नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
चार दुकानातील साहित्य जळून खाक झाले आहे. याठिकाणी मोबाईलचे दुकान, पान टपरी, स्वीट मार्ट दुकान अशी चार दुकाने आगीत जाळून खाग झाली आहेत. आग कशामुळे लागली याचे कारण मात्र कळू शकले नाही. पहाटेपासून लागलेल्या आगीत सकाळी साडे सात वाजेपर्यंत नागरिकांनी आग विझविण्याचा आटोक्यात प्रयत्न केला. यावरून आगीचे रौद्ररूप लक्षात येते. चार दुकानात आग लागल्याचे समजताच नागरिकांची तोबा गर्दी पाहायला मिळाली. यावेळी अनेक नागरिकांनी आग विझवण्यासाठी प्रयत्न केले. आग आटोक्यात येत नसल्याने आष्टी वरून अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले त्यावेळी चार दुकाने जळून खाक झाली होती. आग विझवण्यासाठी स्थानिक नागरिकांकडून मदतकार्य सुरू होते . घटनास्थळी कारंजा पोलीस दाखल झाले होते.
आणखी वाचा-तायवाडे म्हणतात ओबीसींवर अन्याय नाही, भुजबळांना समर्थनही नाही
स्थानिक कारंजा नागरी समस्या संघर्ष समिती मागील तीन वर्षापासून नगरपंचायत प्रशासनाकडे निवेदने, स्मरणपत्रे व आंदोलने करून अग्निशमन गाडीची मागणी करीत आहे. २०२० पासून कारंजा नगरपंचायत नागरिकांकडून अग्निशमन कर आकारीत आहे. परंतु नगरपंचायत कडे मात्र आग विझविण्याकरीता स्वतःची अग्निशमन गाडी उपलब्ध नाही.
तीन महिन्यातच आगीची दुसरी घटना घडलेली आहे. दिवाळीमध्ये नगरपंचायत च्या कचरा डेपोला आग लागली होती. नगरपंचायत प्रशासनाने युद्ध पातळीवर प्रयत्न करून अग्निशमन यंत्रणेला प्राथमिकता द्यावी असे नागरी समितीने म्हटले आहे.