मेहकर येथील स्वर्गीय अब्दुल हबीब कुरेशी मटन मार्केटमध्ये आज, बुधवारी अचानक लागलेल्या आगीने खळबळ उडाली. संध्याकाळी साडेचार वाजताच्या सुमारास आठवडी बाजारात लागलेल्या आगीत लाखोंचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. नगरपरिषदेचे अग्निशामक दल तत्काळ आल्याने आग लवकर नियंत्रणात आली.
हेही वाचा >>> स्मार्ट सिटी’ प्रकल्पाचे केवळ ५० टक्केच काम, कारणे काय? वाचा
मेहकरच्या आठवडी बाजारमध्ये नगरपरिषदेचे स्वर्गीय अब्दुल हबीब क़ुरैशी मटन मार्केट असून ते जीर्ण झाल्याने बंद अवस्थेत आहे. बाजूलाच शेख कल्लू शेख इब्राहिम यांची भंगारची दुकान असून त्यांनी विकत घेतलेला सर्व भंगार मार्केटमध्ये ठेवला होता. सायंकाळी साडेचारच्या सुमारास अचानकपणे आग लागल्याने सर्वत्र धूर पसरला. नागरिकानी आग विझविण्याचे प्रयत्न सुरू केले असतानाच अग्निशमनदल दाखल झाले. यामुळे आग आटोक्यात आली. आगीत प्लास्टिकच्या वस्तू, वाहनाचे टायर व खाली पाणी बॉटल जळून खाक झाले. तीन लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. पोलीस निरीक्षक शिंगटे, पालिका अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.