बुलढाणा: जिल्ह्यातील खामगाव येथील एमआयडीसी मधील अथर्व ॲग्रोटेक उद्योग प्रकल्पात आज शनिवारी अचानक आग लागली. कंपनीमध्ये सरकी असल्यामुळे आगीने पाहता पाहता रौद्र स्वरूप धारण केले. यात सुदैवाने प्राणहानी झाली नाही.
मात्र लाखोंची हानी झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. घटनेची माहिती मिळताच खामगाव नगरपालिका चे अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले.
हेही वाचा…वर्धा : जंगलात पाणीटंचाई, प्राण्यांसाठी १५ बोअरवेलचे काम सुरू
आग जास्तच भडकल्याने नांदुरा,शेगाव येथील अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले होते. आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण आणि नुकसानीचा तपशील कळू शकला नाही.