नागपूर : नागपूरचे प्रसिद्ध मिष्ठान्न भंडार आणि लोकपसंतीस उतरले रेस्टॉरंट्स राम भंडार ( प्रतापनगर) मध्ये एअर कॉम्प्रेसरचा स्फोट होऊन आग लागली. या हॉटेलमधील ही दुसरी घटना आहे.
आगीची घटना घडली तेव्हा रेस्टॉरंट्स बंद होते. मध्यरात्री ही घटना घडली. त्यामुळे जीवित हानी झाली नाही. मात्र हॉटेलमधील अनेक वस्तू आगीत भस्मसात झाल्या.त्यामुळे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले.
आगीच्या घटनेची माहिती मिळताच महापालिकेच्या त्रिमूर्तीनगर अग्निशमन विभागाचे तीन बंब प्रतापनगरातील राम भंडारमध्ये प़हचले व त्यांनी आग विझवली. आगीचे कारण कळू शकले नाही.