नागपूरातील बेलतारोडी येथील महाकाली नगर झोपडपट्टी परिसरात भीषण आग लागली आहे. सिलेंडच्या स्फोटामुळे ही आग लागल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

हेही वाचा – मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर गॅस टँकर उलटून घडलेल्या भीषण अपघातात तिघांचा मृत्यू

आगीत अनेक झोपड्या जळून खाक

या आगीत अनेक झोपड्या जळून खाक झाल्या आहेत. आज सकाळच्या सुमारास ही आग लागली. सिलेंडरच्या स्फोटामुळे ही आग लागल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र, आगीचे नेमके कारण अजून स्पष्ट झाले नाहीये.

हेही वाचा – पुणे: घरात शिरून टोळक्याची वकिलाला मारहाण; ५ जणांना अटक


काही दिवसांपूर्वी चालत्या सीटीबसला लागली आग
नागपुरात तापमानाचा पारा ४५ अंशाच्या पुढे पोहोचला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी आग लागण्याच्या घटनांचे प्रमाण वाढले आहे. काही दिवसांपूर्वीच आरबीआय चौकात चालत्या सिटी बसला आग लागल्याची घटना घडली होती. मात्र, वेळीच प्रवाश्यांना बाहेर काढल्यामुळे जीवितहानी टळली. त्यापूर्वी देखील काही वाहनांना देखील उष्णतेमुळे आग लागली होती.