भंडारा : आज, ९ मे रोजी सकाळी ५ वाजता दरम्यान भंडाऱ्यातील बडा बाजार येथील बिसेन हॉटेलला भीषण आग लागली. अग्निशमन दलाला आग लागल्याची सूचना मिळताच तात्काळ अग्निशमन वाहन घटनास्थळी रवाना करण्यात आले. काही मिनिटाच्या आत अग्निशामक दल घटनास्थळी पोहोचल्याने अनर्थ टळला. अवघ्या तीस मिनिटांमध्ये आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> नागपूर विभागातील अवयव प्रत्यारोपणाची विक्रमाकडे वाटचाल

शहरातील बडा बाजार परिसरात प्रसिद्ध  बिसेन हॉटेल आहे. लोकेश कारेमोरे यांच्या बिसेन हॉटेलच्या तिसऱ्या माळ्यावर शेव चिवडा, खारा, मिठाई , डालडा साठवणूक केलेल्या खोलीमध्ये प्रचंड आग होती. मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या तेथील एका नागरिकाने बिल्डिंगमध्ये मोठ्या प्रमाणात धूर बाहेर येत असल्यास दिसतात त्यांनी लगेच अग्निशमन दलाला कॉल केला. मोठ्या प्रमाणामध्ये खारा मसाला यांचे प्लास्टिक पॉकिट बंद कपाटात असल्यामुळे आग भडकत होती. आगीचे तीव्रता बघून अग्निशमन अधिकारी यांनी घटनास्थळी दुसरी अग्निशमन वाहन क्रमांक एम एच ३६ ए ए २५२९ सुद्धा पाचरण करण्यात आले.

हेही वाचा >>> लोकजागर- निवडणूक आख्यान – एक

खूप मोठ्या प्रमाणामध्ये धुराचे लोट बाहेर निघत होते अशा वेळी काच फोडून वेंटिलेशन करण्यात आले. तिखट धुरामध्ये काम करणे अवघड होते परंतु अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्तीचे प्रयत्न करून आग विझवली असे अग्निशामक अधिकारी समीर गणवीर यांनी सांगितले.

७ एलपीजी व्यावसायिक गॅस सिलेंडर लगेच बाहेर काढल्यामुळे मोठी जीवित हानी टाळली असून परिसरातील नागरिकांच्या सतर्कतेमुळे अग्निशमन दलाला लगेच सूचना प्राप्त झाली असेही गणवीर यांनी सांगितले.

आगीचे कारण अद्यापही अस्पष्ट आहे

मुख्याधिकारी करणकुमार चव्हाण यांच्या मार्गदर्शनात तसेच नगर अग्निशमन अधिकारी समीर गणवीर यांच्या नेतृत्वामध्ये वाहन चालक कृष्णा मसराम, रवींद्र कुमार खंगारे, फायरमन अखिल शेख व सागर गभने यांनी कठीण परिश्रम घेत आगीवर नियंत्रण मिळविले आहे. यात कोणतीही जीवित हनी नाही.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fire broke out in bisen hotel at bada bazaar in bhandara ksn 82 zws