नागपूर : उन्हाळ्यात लाकडाच्या कारखान्यांसह विविध उद्योगांना लागणाऱ्या आगीचे वाढते प्रमाण बघता यावर्षी महापालिकेच्या अग्मिशमन विभागाकडून लवकरच विविध उद्योग, कारखान्यांसह खासगी रुग्णालयात सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना आहे की नाही आणि अग्निशमन यंत्रणाची तपासणी केली जाणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दरवर्षी उन्हाळ्यामुळे लाकडाच्या कारखान्यांसह (सॉ मिल) विविध भागांतील इमारतींमध्ये असलेल्या छोट्या उद्योगांना आग लागते आणि त्यानंतर चौकशी केली असता तिथे अग्निशमन यंत्रणा नसल्याचे उघडकीस आल्यावर संबंधितांवर कारवाई केली जाते. मात्र, यावर्षी उन्हाळा लागण्यापूर्वी शहरातील विविध भागांतील लाकूड कारखान्यांसह ज्या इमारतीमध्ये ज्वलनशील पदार्थ असलेले छोटे उद्योग आहेत,अशा उद्योगांची झोन पातळीवर तपासणी केली जाणार आहे.

हेही वाचा – साहित्य अकादमी नोकरशहा चालवतात!, महेश एलकुंचवार यांचे परखड मत

शहरातील दहा झोनमध्ये अशा २४६० निवासी इमारती असून, त्या ठिकाणी वेगवेगळे छोटे उद्योग सुरू आहेत. त्यात अनेक ठिकाणी ज्वलनशील पदार्थ असलेले उद्योग आहे. मात्र, त्याची गेल्या काही वर्षांत दखल घेण्यात आली नाही. शहरातील सर्वाधिक अशा इमारती गांधीबाग झोनमध्ये आहे. त्यानंतर मंगळवारी, धरमपेठ, लकडगंज झोनमध्ये आहे. गांधीबाग व लकडगंज व सतरंजीपुरा झोनअंतर्गत येत असलेल्या मस्कासाथ, इतवारी, लाल इमली, जागनाथ बुधवारी, लकडगंज, वर्धमाननगर या भागात अशा इमारती आहेत. त्यामुळे अशा भागांतील अनेक उद्योगांसह लाकडाच्या कारखान्याची उन्हाळा लागण्यापूर्वी तपासणी केली जाणार आहे. ज्यांच्याकडे अग्निशमन यंत्रणा नाही त्यांना नोटीस दिली जाणार आहे.

खासगी रुग्णालयांची तपासणी होणार

शहरातील अनेक खासगी रुग्णालयांमध्ये अग्निशमन यंत्रणा नसल्याची बाब उघडकीस आली आहे. शहरात खासगी रुग्णालयांची संख्या वाढत असताना अनेक ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने नियमांचे पालन केले जात नाही. धंतोली, रामदासपेठ, सक्करदरा आणि प्रतापनगर हा भाग ‘मेडिकल हब’ म्हणून ओळखला जातो. रुग्णालयांसाठी इमारत उभारताना त्यासंबंधी अग्निशमन विभागाकडून रितसर परवानगी घेणे गरजेचे आहे. इमारतीच्या नकाशाला मंजुरी घेताना विभागाने टाकलेल्या अटींची पूर्तता करण्याचे आश्वासन संबंधित डॉक्टरांकडून दिले जाते. परंतु, इमारत पूर्ण झाल्यानंतर या अटींकडे मात्र दुर्लक्ष केले जाते. नियमानुसार इमारतीच्या वापरानुसार अग्निशम यंत्रणा उभारण्यासंबंधी वेगवेगळ्या अटी आहेत. त्या अटींची पूर्तता करण्यात आली की नाही याची तपासणी अग्निशमन विभागाकडून केली जाणार आहे.

हेही वाचा – नागपूर विद्यापीठाला महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाची भेट; प्राध्यापकांची पदे तातडीने भरण्याच्या सूचना

वर्षभर शहरातील सर्व लाकडाचे कारखाने, छोटे उद्योग, मोठ्या इमारती, खासगी रुग्णालयासह विविध ठिकाणी मोठ्या इमारतींमध्ये अग्निशमन यंत्रणेबाबत जागृत केले जात आहे. तसेच संबंधितांकडे ही यंत्रणा नसेल तर नोटीस दिली जात आहे, अशी माहिती महापालिका अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके यांनी दिली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fire department of nagpur mnc will inspect various industries factories and private hospitals to see safety measures vmb 67 ssb