पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करावी, असे आवाहन सरकारने केले असतानाही उपराजधानीत मात्र ७०० पेक्षा जास्त फटाक्याच्या दुकानांना परवानगी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, यंदा फटाके २० टक्क्यांनी महागले आहेत.शहरात विविध भागात वर्दळीच्या ठिकाणी अनेक फटाके विक्रेत्यांनी नियम डावलून दुकाने थाटली आहे. त्यासाठी अनेकांनी पोलीस आणि महापालिकेची परवानगी घेतली नसल्याचे दिसून येत आहे. आतापर्यंत ७५६ दुकानांना परवानगी देण्यात आली आहे. त्यात सर्वाधिक १५१ दुकाने ही सक्करदरा केंद्राअंतर्गत आहे. आतापर्यंत महापालिकेच्या अग्निशमन विभागाकडे ७५६ दुकानदारांनी नोंदणी केली आहे. मात्र, प्रत्यक्षात २०० पेक्षा अधिक लोकांनी परवानगी न घेता दुकाने थाटल्याची माहिती समोर आली आहे. दिवाळीच्या आधी शहरातील विविध भागात फटाक्यांची दुकाने थाटली जात असून त्यांना पोलीस आणि महापालिकेतर्फे रितसर परवानगी दिली जाते. आग लागू नये म्हणून ज्या ठिकाणी मोकळी जागा आहे त्या ठिकाणी दुकानांसाठी जागा दिली जाते. मात्र, यावेळी अनेक विक्रेत्यांनी मिळेल त्या जागी दुकाने थाटली आहे. त्यात इतवारी, गांधीबाग, सक्करदरा, महाल, गोकुळपेठ या भागांचा समावेश आहे. अनेकांनी महापालिकेची परवानगी न घेता वर्दळीच्या ठिकाणी दुकाने थाटली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा