चंद्रपूर : राजुरा येथे अज्ञात इसमाने केलेल्या अंधाधुंद गोळीबारात भाजयुमो नेते सचिन डोहे यांची पत्नी पूर्वशा डोहे यांचा जागीच मृत्यू झाला असून अन्य एका व्यक्तीच्या पाठीला गोळी लागल्याने त्याला चंद्रपूर येथे हलविण्यात आले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्राप्त माहितीनुसार, सोमनाथपूर वॉर्ड येथे राहणाऱ्या लल्ली नामक व्यक्तीला वैयक्तिक शत्रुत्वातून मारण्यासाठी अज्ञात व्यक्ती शहरात आले होते. ही बाब लल्ली याच्या लक्षात येताच तो रविवारी रात्री ९ ते ९.३० च्या दरम्यान भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष सचिन डोहे यांच्या घरात शिरला. तेव्हा मागावर असलेल्या मारेकऱ्यांनी त्याच्यावर अंधाधुंद गोळीबार सुरू केला. नेमक्या त्याच वेळी पूर्वशा डोहे अंगणात आल्याने त्यांना छातीत गोळी लागून त्या जागीच कोसळल्या तर लल्लीच्या पाठीला गोळी लागली.

हेही वाचा – ‘पुणेरी मेट्रो’च्या कामाला गती; ७० टक्के खांबांची उभारणी पूर्ण

हेही वाचा – पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावर खंडाळा घाटात दरड कोसळली; सुदैवाने जीविहितहानी नाही

घटना लक्षात येताच घरातील मंडळींनी शेजाऱ्यांच्या मदतीने दोघानाही तात्काळ उपजिल्हा रुग्णालय राजुरा येथे दाखल केले मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पूर्वशा डोहे यांना मृत घोषित केले तर गंभीर जखमी असलेल्या लल्ली याला चंद्रपूर येथे हलविण्यात आले. घटनेच्या वेळी भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष सचिन डोहे हे काका माजी नगरसेवक राजेंद्र डोहे यांच्यासह बाहेर गेले होते.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Firing in rajura bjp leader sachin dohe wife died rsj 74 ssb