चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्घुस येथील काँग्रेसचे शहर अध्यक्ष राजूरेड्डी यांच्या निवासस्थानी अज्ञात इसमांनी आज, रविवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास गोळीबार केला. या घटनेने घुघुस शहरात खळबळ उडाली. एक गोळी घराच्या छतावर मिळाली.
राजूरेड्डी रात्री घरी गेले असता वरच्या माळ्यावर गोळीबाराचा आवाज आला. त्यावेळी राजूरेड्डी खालच्या माळ्यावर होते. वरच्या माळ्यावर भाडेकरू राहतात. राजूरेड्डी यांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलीस घटनास्थळी पोहचले असून पुढील तपास सुरू आहे.