चंद्रपूर : शहरातील अतिशय वर्दळीचे ठिकाण असलेल्या रघुवंशी कॉम्प्लेक्स येथे महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष अमन अंधेवार यांच्यावर अज्ञात व्यक्तीने गोळीबार केल्याने खळबळ उडाली आहे. या गोळीबारात अंधेवार यांच्या पाठीला गोळी लागल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना प्राथमिक उपचारानंतर नागपूर येथे हलविण्यात आले आहे. दरम्यान तीन वर्षांत रघुवंशी कॉम्प्लेक्स येथे दुसऱ्यांदा गोळीबाराची घटना घडल्याने भितीचे वातावरण आहे.

शहराच्या मध्यभागी आझाद बगीच्यालगत रघुवंशी कॉम्प्लेक्स ही इमारत आहे. बँक, शिकवणी वर्ग, जिम, मसाज सेंटर व बियर बारमुळे या कॉम्प्लेक्समध्ये सकाळपासून रात्री उशिरापर्यंत लोकांची वर्दळ असते. याच कॉम्प्लेक्समध्ये मनसेच्या कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष अमन अंधेवार यांचे कार्यालय आहे. आज गुरुवार ४ जुलै रोजी दुपारी दिड वाजताच्या सुमारास अंधेवार कार्यालयात येण्यासाठी रघुवंशी कॉम्प्लेक्सच्या लिफ्टजवळ आले. तिथे त्यांनी लिफ्टची बटन दाबली आणि लिफ्टचा दरवाजा उघडण्यापूर्वीच त्यांच्या मागून आलेल्या एका अज्ञात व्यक्तीने गोळीबार केला. या व्यक्तीने बंदुकीतून दोन फायर केल्या. त्यातील एक गोळी अंधेवार यांना चाटून गेली तर दुसरी गोळी त्यांच्या पाठीला लागली. गोळीबार होताच काॅम्पलेक्समध्ये एकच धावपळ उडाली. या कॉम्पलेक्समध्ये ५० पेक्षा अधिक व्यावसायिक दुकाने आहेत. त्यामुळे सर्व जण दुकानातून बाहेर आले व बघायला लागले तर अंधेवार यांच्या पाठीवर गोळी लागल्याने जखमी झाले होते. त्यांच्या पाठीतून रक्त निघत होते तर गोळीबार करणारा घटनास्थळावरून पसार झाला होता. त्याच वेळी अंधेवार जीव वाचविण्याच्या भितीने याच कॉम्पलेक्समधील हासानी यांच्या कपड्याच्या दुकानात गेले. तिथे ते एक लाकडी दांडा हातात घेवून बाहेर आले. मात्र तोपर्यंत गोळीबार करणारा पसार झाला होता.

Cylinder explosion on a handcart in front of Shivajinagar court pune news
शिवाजीनगर न्यायालयासमोरील हातगाडीवर सिलिंडरचा स्फोट; तीनजण किरकोळ भाजून जखमी
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Seven maoists killed in abhujmad encounter
गडचिरोली : अबुझमाडमध्ये जवान व नक्षल्यांमध्ये जोरदार चकमक;  सात नक्षल्यांना कंठस्नान
akshay kumar
‘हाऊसफुल ५’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अक्षय कुमारच्या डोळ्याला दुखापत
fire broke out at scrap warehouse at Kudalwadi in Chikhli on Monday morning
पिंपरी : चिखलीतील गोदामांच्या आग प्रकरणी जागा मालकाचा शोध
BJP leaders vikasrao dube son amol dube kidnapped from Parli ransom of Rs 2 crore demanded
परळीतून भाजप नेत्याच्या मुलाचे अपहरण; दोन कोटींच्या खंडणीची मागणी
Cylinder explosion in Badlapur one injured
Cylinder explosion : बदलापुरात सिलेंडरचा स्फोट, एक जखमी
fire broke out Bavdhan area, Bavdhan area fire,
पुणे : बावधन भागातील इमारतीत मोठी आग, स्टुडिओतील साहित्य जळून खाक

हेही वाचा – तक्रार करण्यासाठी अस्वल जेव्हा पोलीस ठाण्यात येते तेव्हा! पोलीस कर्मचाऱ्यांची बोबडी वळली, एकच पळापळ…

या घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस ठाणे ठाणेदार प्रभावती एकुरके ताफा घेवून घटनास्थळी पोहोचल्या. स्थानिक गुन्हे शाखेचे महेश कोंडावर हे देखील घटनास्थळी आले. त्यांनी जखमी अंधेवार यांना कुबेल हॉस्पीटल येथे उपचारासाठी नेले. तिथे प्राथमिक उपचार केल्यानंतर नागपूर येथे हलविण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अति.पोलीस अधीक्षक रिना जनबंधु घटनास्थळी आले. यावेळी कॉम्प्लेक्समधील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. या सीसीटीव्ही फुटेजमध्ये गोळीबार करणारी अज्ञात व्यक्ती तोंडाला पांढरा रूमाल बांधून फिरत असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. विशेष म्हणजे तीन वर्षांपूर्वी २०२१ मध्ये अंधेवार यांचे लहान भाऊ यांच्यावरही रघुवंशी कॉम्पलेक्स येथे गोळीबार झाला होता. तेव्हाही अंधेवार थोडक्यात बचावले होते.

हेही वाचा – शरद पवारांची ‘ती’ ऑफर ‘या’ खासदाराने नाकारली, नेमकं काय घडलं? जाणून घ्या

बल्लारपुरातील बहुरिया हत्याकांडाची पार्श्वभूमी या गोळीबारामागे असल्याचे सांगण्यात येत आहे. यासंदर्भात पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांना विचारले असता, संबंधित व्यक्तीने अन्य ठिकाणाहून शस्त्र मागविले होते अशी माहिती पोलिसांना होती असे सांगितले. दरम्यान या गोळीबारामागे नेमके कोण आहे, तसेच गोळीबार करून फरार झालेल्या अज्ञात व्यक्तीचा पोलीस शोध घेत आहे. अमन अंधेवार यांनी तीन महिन्यांपूर्वीच येथे जनसंपर्क कार्यालय सुरू केले होते. त्यांच्या कार्यालयात वर्दळही बरीच होती. त्यांचे कुणाशी वैर होते याचीही माहिती पोलीस घेत आहेत.

Story img Loader