लोकसत्‍ता टीम

अमरावती : शिवसेना शिंदे गटाचे जिल्‍हाप्रमुख गोपाल अरबट यांच्‍या कारवर गोळीबार करण्‍यात आल्‍याची घटना समोर आली असून या प्रकरणी अरबट यांच्‍या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपींच्‍या विरोधात गुन्‍हा दाखल केला आहे. अमरावतीत शिवसेनेच्‍या दोन जिल्‍हाप्रमुखांमध्‍ये अंतर्गत वाद असून त्‍यातून ही घटना घडल्‍याचे सांगण्‍यात येत आहे. अमरावती ते दर्यापूर मार्गावर पाटील धाब्‍यासमोर वलगाव पोलीस ठाण्‍याच्‍या हद्दीत सोमवारी मध्‍यरात्रीनंतर ही घटना घडली.

maharashtra assembly election 2024 ncp participation in power was certain with shinde rebellion ajit pawar
शिंदे यांच्या बंडाच्या वेळीच राष्ट्रवादीचाही सत्तेत सहभाग निश्चित; अजित पवार यांचा गौप्यस्फोट
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Oppositions stole promises along with schemes criticized Eknath Shinde in Ambernath
“विरोधकांनी योजनांसह वचननामाही चोरला…”, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची अंबरनाथमध्ये टीका
airoli vidhan sabha marathi news
ऐरोलीतील बंडोबांना शिंदे सेनेचे अभय ?
seven people dismissed from Shiv Sena Shinde party
शिवसेना (शिंदे) पक्षातील सात जणांची हकालपट्टी
Eknath Shinde allegation regarding Mahavikas Aghadi manifesto Jalgaon news
महाविकास आघाडीने जाहीरनामा चोरला; एकनाथ शिंदे यांचा आरोप
Eknath Shinde, Eknath Shinde comment on Mahavikas Aghadi, Mehkar,
मुख्यमंत्री शिंदे म्हणतात, “धनुष्य चोरायला ते काही खेळणं आहे का? लाडक्या बहिणींना एकविसशे रुपये…”

गोपाल अरबट हे अमरावतीतील कामे आटोपून त्‍यांच्‍या इनोव्‍हा कारने दर्यापूर येथे जात असताना चांगापूर फाट्याजवळ काळ्या रंगाची स्‍कॉर्पिओ आली. या वाहनातील तीन ते चार जणांनी अरबट यांचे वाहन थांबवून त्‍यांना शिवीगाळ केली. त्‍यानंतर ते वेगाने समोर निघून गेले. शिवीगाळ करणारे लोक दारूडे असतील असे समजून अरबट यांनी आपल्‍या वाहनाचा वेग कमी केला आणि ते दर्यापूरकडे निघाले. वाटेत पाटील धाब्‍यासमोर काळ्या रंगाची स्‍कॉर्पिओ गाडी रस्‍त्‍याच्‍या कडेला उभी होती. बाजूला ३ ते ४ लोक उभे होते. त्‍यांनी हात दाखवून वाहन थांबविण्‍यास सांगितले. अरबट यांना एका जणाच्‍या हाती बंदूक दिसली आणि अचानक फटाका फुटल्‍यासारखा आवाज आला. त्‍यांच्‍या गाडीचा डाव्‍या बाजूचा काच फुटून सीटवर पडला. अरबट त्‍यामुळे घाबरले. त्‍यानंतर ते वेगाने दर्यापूरच्‍या दिशेने निघाले. त्‍यांनी वाहन चालवत असताना पोलिसांशी मोबाईलवरून संपर्क साधून संपूर्ण घटनाक्रम सांगितला.

आणखी वाचा-हृदयद्रावक! स्कूल व्हॅनने विद्यार्थ्याला चिरडले; घटनास्थळीच सोडला जीव

या दरम्‍यान, दोन चारचाकी वाहनांनी त्‍यांचा पाठलाग सुरू असल्‍याचे अरबट यांना दिसताच त्‍यांनी आसेगाव टी पॉइंटवरून खल्‍लार आणि शिंगणापूर मार्गावर आले. तेव्‍हा त्‍यांना पोलिसांनी वाहने दिसली. दर्यापूर पोलीस आणि स्‍थानिक गुन्‍हे शाखेचे पोलीस कर्मचारी त्‍या ठिकाणी हजर होते. अरबट यांनी त्‍यांना संपूर्ण घटनाक्रम सांगितला. घटनास्‍थळ हे वलगाव पोलीस ठाण्‍याच्‍या हद्दीत येत असल्‍याने वलगाव पोलीस ठाण्‍यात तक्रार नोंदवली, असे अरबट यांनी पोलीस तक्रारीत म्‍हटले आहे.

आणखी वाचा-पक्षश्रेष्ठींचा आशीर्वाद अन् दोघेही बाशिंग बांधून तयार, पण सुमंगल कोणाचे? गोंदियावरून आघाडीत तिढा!

शिवसेना शिंदे गटाचे दुसरे जिल्‍हाप्रमुख अरूण पडोळे यांना आपले वर्चस्‍व सहन होत नसल्‍याने अरूण पडोळे यांच्‍या सांगण्‍यावरून प्रवीण दिधाते आणि सागर खिराडे यांनी त्‍यांच्‍या संपर्कातील काही अज्ञात युवकांना आपल्‍याला ठार मारण्‍याच्‍या उद्देशाने गोळीबार केला, असा संशय अरबट यांनी व्‍यक्‍त केला आहे. गेल्‍या २१ जुलै रोजी अरूण पडोळे आणि अरबट यांच्‍यात वाद उफाळून आला होता, यावेळी अरबट यांना मारहाण देखील करण्‍यात आली होती. अरबट यांचा मित्र राहुल भुंबर याचा पडोळे यांच्‍या गटातील काही लोकांसोबत वाद आहे, या घटनेला ती पार्श्‍वभूमी असल्‍याचे सांगण्‍यात आले आहे.