लोकसत्ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

नागपूर: गडचिरोली, नंदूरबार या मागास भागासह जगभरातील आदिवासींच्या आरोग्यावर मंथनासाठी पहिली आंतराष्ट्रीय परिषद नागपुरातील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेतील (एम्स) सभागृहात ३१ जानेवारी ते २ फेब्रुवारी दरम्यान आयोजित करण्यात आली आहे. त्यात भारतासह १७ देशातील प्रतिनिधी सहभागी होणार आहेत.

एम्स आणि महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या (एमयूएचएस) संयुक्त विद्यमाने ही परिषद होणार आहे. शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेत महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे डॉ. संजीव चौधरी व एम्सचे कार्यकारी संचालक डॉ. प्रशांत जोशी याबाबत माहिती देताना म्हणाले, एमयूएचएस आणि एम्समध्ये आदिवासींमधील संशोधनाबाबत सामंजस्य करार झाला आहे. त्यानंतर प्रथमच आदिवासींच्या आरोग्यावर जगातील पहिली परिषद नागपुरात घेतली जात आहे.

या परिषदेला भारतासह आदिवासींची संख्या जास्त असलेल्या देशातील आदिवासींसाठी काम केलेली मोठी मंडळी, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. परिषदेत भारतासह विविध देशात आदिवासींमध्ये आढळणारे आजार, त्यावर ते घेत असलेले उपचार, आदिवासींच्या राहणीमानासह इतरही महत्वाच्या गोष्टींवर मंथन होईल. चांगले आयुष्य जगण्यासाठी पारंपरिक उपचार पद्धतीत बदल करून आदिवासींना कसा लाभ देता याईल, त्यावरही परिषदेत मंथन केले जाईल. सोबत आदिवासींची संख्या जास्त असलेल्या देशात आदिवासींच्या धोरणाचा लाभ होत असल्यास त्याचीही माहिती येथे घेतली जाईल. या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून भविष्यात भारताला आदिवासींसाठी विशेष धोरणात त्याचा लाभ व्हावा म्हणून ते तसा अहवाल केंद्र सरकारसह राष्ट्रपतींनाही दिला जाणार असल्याचे डॉ. संजीव चौधरी यांनी सांगितले.

परिषदेचे उद्घाटन ३१ जानेवारीला संध्याकाळी ५.३० वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या उपस्थितीत होईल. परिषदेची संकल्पना आरोग्य विद्यापीठाच्या कुलगुरी डॉ. माधुरी कानिटकर यांची असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. या पत्रपरिषदेला डॉ. मनिषा कोठेकर, डॉ. किरण टवलारे, डॉ. दर्षन दक्षीणदास, संदीप राठोड उपस्थित होते.

आदिवासींच्या गावाची सुंदर कलाकृती

आदिवासींसाठी आयोजित या जगातील पहिल्या परिषदेसाठी एम्समध्ये सुंदर आदिवासींच्या गावाची कलाकृती तयार करण्यात आली आहे. येथे देशातील विविध भागातील आदिवासींनी बांबूपासून तयार केलेले साहित्य प्रदर्शनासाठी ठेवले जातील. त्यासाठी विविध सामाजिक संस्थांची मदत होत असल्याचेही पत्रकार परिषदेत सांगण्यात आले. परिषदेत भारतासह जगातील १७ देशातील वक्ते आपल्या देशातील आदिवासींच्या आजार, राहणीमानावर प्रकाश टाकतील.