वर्धा : ओबीसी मुलींसाठी पहिले शासकीय वसतिगृह नाशकात सुरू झाले आहे. राज्य स्थापन झाल्यानंतर प्रथमच अशी विशेष व्यवस्था उपलब्ध झाली असल्याची माहिती पुढे आली आहे.
हेही वाचा – नागपूर : गडकरींच्या शहरातील रस्त्यांवर खड्डे; आम आदमी पार्टीचे आंदोलन
हेही वाचा – चंद्रपूर : बिबट घरात घुसला अन् कुटुंबीयांचा…
महाज्योतीचे माजी संचालक दिवाकर गमे यांनी २४ फेब्रुवारीस नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांनी बोलावलेल्या बैठकीत हा मुद्दा लावून धरला होता. २० मार्चला त्याचे उदघाटन होणार आहे. दोनशे मुलींची प्रवेशक्षमता असलेल्या या वसतिगृहात प्रवेश घेण्यासाठी १ ते १५ मार्चपर्यंत अर्ज मागविण्यात आले आहे. निवड समिती २०० मुलींची निवड करेल. २० मार्चला रीतसर प्रवेश होतील. याबाबत प्रक्रिया होऊनही वसतिगृह सुरू न झाल्याने प्रा.गमे यांनी शासनास नोटीस दिली होती. सुरू न झाल्यास नाशिक येथे आमरण उपोषण करण्याचा इशाराही त्यांनी दिला. अखेर हे काम मार्गी लागले, याचा आनंद असल्याचे ते म्हणाले. प्रवेशात ७५ ओबीसी, ७५ मराठा व ५० आर्थिक दुर्बल घटकांच्या मुलींना प्रवेश मिळणार आहे.