चंद्रपूर : विदर्भ ही नैसर्गिक साधनसंपत्तीने विपुल असलेली भूमी आहे. सोबतच येथे वाघांचे अधिराज्य असल्यामुळे या भूमीतही चित्रपटांची निर्मिती व्हावी, येथील कलावंतांना व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने सांस्कृतिक कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने चंद्रपुरात पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवलचे आयोजन होत आहे.

राज्य शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग आणि पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल यांच्या संयुक्त विद्यमाने ११ ते १३ मार्च २०२३ या तीन दिवसात चंद्रपूर येथील मिराज सिनेमा, एम.डी.आर. मॉल येथे या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. ११ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते सदर कार्यक्रमाचे उद्घाटन होणार असून ‘पंचक’ या मराठी चित्रपटाने फिल्म फेस्टिवलचा आगाज होणार आहे. यावेळी प्रसिद्ध दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल आणि फिल्म ॲन्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एफ.टी.आय.आय.) चे माजी अधिष्ठाता समर नखाते उपस्थित राहणार आहेत.

The Origin of the Honeymoon Tradition
सफरनामा : मधु इथे अन्…
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Maharashtra Public Holiday 2025 List in Marathi
Maharashtra Holiday List 2025 : सरकारी कर्मचाऱ्यांची सुट्ट्यांची यादी जाहीर! २४ सार्वजनिक सुट्ट्यांसह मिळेल ‘ही’ एक्स्ट्रा सुट्टी
Aai Kuthe Kay Karte Fame Kaumudi Walokar Sangeet Ceremony
Video : “कौमुदी या अखंड ताऱ्यांच्या…”, फिल्मी स्टाइल प्रपोज, जबरदस्त डान्स अन्…; मराठी अभिनेत्रीचा ‘असा’ पार पडला संगीत सोहळा
pushpa 2 director wants to quit industry
Video : चेंगराचेंगरी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर ‘पुष्पा २’ चित्रपटाच्या दिग्दर्शकाचे मोठे विधान, व्हिडीओ झाला व्हायरल
police Pune, police at night, Pune, police news,
पुणे : रात्रीत पोलीस असतातच कोठे ? गंभीर घटनांची जबाबदारी घेणार का?
raigad beaches crowded with tourists
रायगडचे किनारे पर्यटकांनी गजबजले, पर्यटन हंगामाला सुगीचे दिवस
thane farmhouses party loksatta news
सुट्टी नसल्यामुळे जवळच्या ठिकाणी नववर्षाचे स्वागत करण्यास तरुणांची पसंती; कर्जत, लोणावळा, माथेरान मधील शेतघरांमध्ये आगाऊ नोंदणी

हेही वाचा >>> सहव्याधी असणाऱ्यांना एच ३ एन २ साथीचा धोका;  श्वसनरोगतज्ज्ञज्ञडॉ. अशोक अरबट यांची माहिती

स्थानिक भाषेतील चित्रपटांसोबतच आंतरराष्ट्रीय स्तरावरील चित्रपटांची निर्मिती कशी होते. ऑस्कर पुरस्कारासाठी निवडण्यात येणारे चित्रपटांचे विषय, त्यामागची प्रेरणा, त्याची मांडणी या सर्व बाबींची ओळख होऊन आपल्या भूमीतही फिल्म साक्षरता निर्माण व्हावी, हा या फेस्टिवलचा प्रमुख उद्देश आहे. तीन दिवसात देशी चित्रपटांसोबतच विदेशी चित्रपटांचीसुद्धा पर्वणी चंद्रपूरकरांना अनुभवता येणार आहे. ११ मार्च रोजी मिराज सिनेमा, एम.डी.आर. मॉल येथे प्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दीक्षित आणि श्रीराम नेने निर्मित तसेच जयंत जठार आणि राहुल आवटे दिग्दर्शित ‘पंचक’ या मराठी चित्रपटाने फिल्म फेस्टिवलचे उद्घाटन होणार आहे. तर १२ आणि १३ मार्चला प्रत्येकी आठ-आठ चित्रपट दाखवण्यात येणार आहे. अशाप्रकारे एकूण १७ देशी-विदेशी चित्रपटांची रेलचेल चंद्रपुरात राहणार आहे.

हेही वाचा >>> चंद्रपूर : महिलेवर हल्ला करून बिबट्याचा चक्क घरातच ठिय्या

१७ चित्रपटांमध्ये सहा भारतीय चित्रपट आहेत. यात पंचक, मदार आणि टेरीटरी या तीन मराठी चित्रपटांचा समावेश आहे. टेरीटरी हा मराठी चित्रपट वाघांच्या अधिवासावर आधारित असून चंद्रपूर येथील सचिन मूल्यमवार व स्थानिकांनी हा चित्रपट बनवला आहे. इतर तीन भारतीय चित्रपटांमध्ये निहारिका (बंगाली), टोरांज हजबंड (आसामी) आणि बिगीनिंग (तामीळ) यांचा समावेश आहे. तर विदेशी चित्रपटांमध्ये जर्मनी, फ्रान्स, कतार, चिली, अर्जेंटिना, पॅलेस्टाईन, कॅनडा, बेल्जीयम, डेन्मार्क आणि इराण या देशातील चित्रपट त्यांच्या मूळ भाषेत आणि इंग्रजी भाषेसह दाखवण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे, हे सर्व १७ चित्रपट अप्रदर्शित आहेत. त्यामुळे प्रदर्शित होण्यापूर्वीच चंद्रपूरच्या नागरिकांना या चित्रपटांचा आस्वाद घेता येणार आहे. जिल्ह्यातील चित्रपटप्रेमींनी तीन दिवसीय फिल्म फेस्टिवलचा आनंद घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य विभागाने केले आहे.

Story img Loader