महामेट्रो नागपूर तर्फे हिंगणा मार्गावरील ‘लिटील वूड’ येथे निर्मित ‘सेफ्टी पार्क’ अशाप्रकारचा देशातील पहिला पार्क असल्याचे केंद्रीय गृह निर्माण व नगर विकास मंत्रालयाचे सचिव दुर्गा शंकर मिश्रा यांनी सांगितले. यापासून प्रेरणा घेत देशातील अन्य मेट्रो प्रकल्पांना देखील अशा पार्कची उभारणी करावी, असे आवाहन गुरुवारी केले.

मिश्रा यांच्या हस्ते या प्रकल्पाचे आज उद्घाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते. लिटील वूड जवळ ६०० चौरस फूट क्षेत्रफळावर सेफ्टी पार्क तयार करण्यात आला आहे. येथील तीन षटकोनी संरचना वेगवेगळ्या उद्देशाने कार्य करेल. येथे उभारण्यात आलेल्या संरचना प्रकल्पाचे कार्य सुरू असलेल्या ठिकाणी हलवता येते. शासकीय आणि अशासकीय कर्मचारी, शाळा-महाविद्यलयीन विद्यार्थी, व्यावसायिकांना आणि इतर सर्व नागरिकांना या सेफ्टी पार्कमध्ये बांधकामाशी संबंधित सर्वसुरक्षा नियमाची माहिती आणि प्रशिक्षण देण्यात येणार आहे. बांधकामाकरिता आवश्यक अनेक उपकरणाचे मॉडेल येथे ठेवण्यात आले आहे. सुरक्षेसंबंधित मॉडेल प्रशिक्षण संस्था म्हणून हा पार्क काम करेल. विविध क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी आणि इतर सर्व नागरिकांसाठी या सेफ्टी पार्कचा उपयोग होणार आहे. यामुळे सुरक्षाविषयी जागरूकता वाढण्यास मदत होईल.

Maharashtra rain weather updates
दिवाळीच्या स्वागताला विजांची रोषणाई, ढगांचे फटाके अन् खराखुरा पाऊस !
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट…
Sujay Vikhe Patil Jayashree thorat Sangamner tension
Sangamner News: बाळासाहेब थोरातांच्या मुलीबद्दल बोलताना भाजपा नेत्याची जीभ घसरली; सुजय विखेंच्या सभेनंतर संगमनेरमध्ये तणाव
is Dissatisfaction in North Gadchiroli over Sohle Iron Mine
सोहले लोहखाणीवरून उत्तर गडचिरोलीत असंतोष? खाणीपर्यंत जाणाऱ्या रस्त्याला…
cash seized Maval, Maval, Pimpri, Maval latest news, Maval cash news,
पिंपरी : खेड शिवापूरनंतर आता मावळमध्ये १७ लाख ७५ हजारांची रोकड जप्त
Diwali festival sale of eco friendly sky lanterns in the market Pune news
पर्यावरणपूरक आकाशकंदिलांचा झगमगाट
Loksatta lokshivar Floriculture Crop Marigold Flower Farming
लोकशिवार: फुलशेतीचा सुगंध
balasaheb thorat
नाना पटोले नव्हे, आता काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात मविआशी समन्वय साधणार!

यावेळी महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित, दिल्ली मेट्रो रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक मंगू सिंह, चेन्नई मेट्रो रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक पंकज कुमार बंसल, मेगा मेट्रो रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. आय.पी. गौतम, लखनऊ  मेट्रो रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक कुमार केशव, एनसीआरटीसी मेट्रो रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक विनय कुमार सिंह, नागपूर मेट्रोचे संचालक(प्रकल्प) महेश कुमार,नागपूर मेट्रोचे संचालक(वित्त) एस. शिवमाथन, नागपूर मेट्रोचे महाव्यवस्थापक (प्रशासन) अनिल कोकाटे उपस्थित होते.