चंद्रपूर : राज्याचे वन, सांस्कृतिक मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या बल्लारपूर विधानसभा मतदारसंघाच्या अंतर्गत येणाऱ्या बल्लारपूर तालुक्यातील गावे ओडीएफ प्लसमध्ये बसत असल्याने बल्लारपूर विदर्भातील पहिला ओडीएफ प्लस घोषित करण्यास आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) टप्पा २ अंतर्गत जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनाची कामे चालू असुन. यामध्ये बल्लारपूर तालुक्यातील गावे ओडीएफ प्लसच्या मानकांमध्ये बसत असल्यामुळे नुकताच बल्लारपूर तालुका उदयमान या घटकात ओडीएफ प्लस करण्यात आला असून, बल्लारपूर तालुका विदर्भातील पहिला ओडीएफ प्लस तालुका ठरला आहे.

हेही वाचा – गोंदिया : सरांडी येथे विहिरीत विजेचा शॉक लागून चारजणांचा मृत्यू, मृतदेह अद्याप विहिरीतच

स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) टप्पा २ मध्ये ओडीएफ प्लस करताना उदिमान, उज्वल व उत्कृष्ट या तीन घटकांमध्ये घोषित केल्या जात असून, बल्लारपूर तालुक्यात १७ ग्रामपंचायती असून, २६ गावे या तालुक्यामध्ये आहेत. यापैकी १० गावे उत्कृष्ट या घटकातून ओडीएफ प्लस म्हणून घोषित करण्यात आली तर, १६ गावे उदिमान या घटकातून ओडीएफ प्लस म्हणून घोषित करण्यात आली. त्यानुसार बल्लारपूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अनिरुद्ध वाळके यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे बल्लारपूर तालुका उदयमान या घटकात ओडीएफ प्लस झाल्याचे जाहीर केले आहे. या अगोदर सन २९१६ मध्ये बल्लारपूर तालुका हा विदर्भातील पहिला हागणदारीमुक्त तालुका होण्याचा मान मिळाला होता. तीच परपंरा बल्लारपूर तालुक्याने कायम ठेवली आहे.

हेही वाचा – अंधूक प्रकाशामुळे नागपूरऐवजी विमान वळविले मुंबईकडे

चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर तालुका विदर्भातील पहीला ओडीएफ प्लस तालुका झाला असून, जिल्ह्याकरीता अभिमानाची बाब आहे. अशाच पद्धतीने जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये स्वच्छ भारत मिशन टप्पा – २ अंतर्गत भरीव कामे करुन चंद्रपूर जिल्हा ओडीएफ प्लस करण्यासाठी प्रयत्न करावे. – नुतन सावंत, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, पाणी व स्वच्छता.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: First odf plus taluka in vidarbha announced read details rsj 74 ssb