नागपूर : जंगलाच्या संरक्षणाचा भार वनखात्यातील ज्या पहिल्या फळीवर आहे, त्या पहिल्या फळीची कमतरता वनखात्यात आहे. पहिल्या फळीतील वनरक्षक भरतीला सोमवारपासून सुरुवात झाली आहे. या भरतीसाठीची ऑनलाइन परीक्षा येत्या ११ ऑगस्ट पर्यंत घेण्यात येत आहे. वनरक्षक भरतीसोबतच सर्वेक्षण, लेखापाल, लघुलेखक तसेच संख्याशास्त्राची पदभरती केली जाणार आहे. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस यांच्या सहकार्याने वनखाते ही परीक्षा घेत आहे. पाच लाखाहून अधिक विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. त्यासाठी राज्यभरात १२९ परीक्षा केंद्र आहेत. या भरतीप्रक्रियेअंतर्गत वनरक्षकांची २, १३८ पदे भरली जाणार आहेत. नागपूर वनवृत्तांतर्गत भंडारा, गोंदिया, वर्धा, नागपूर येथे २० केंद्रावर ही परीक्षा घेतली जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा