चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्याने महाराष्ट्राला वेगळी ओळख दिली आहे. सर्वात जास्त उद्योगधंदे या जिल्ह्यात असून ऐतिहासिक वारसादेखील लाभला आहे. राज्याच्या कोपऱ्यात असलेल्या या जिल्ह्याला विकासाच्या बाबतीत प्रथम प्राधान्य देण्यात येईल, अशी ग्वाही महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी दिली.
महाकाली महोत्सव ट्रस्ट, चंद्रपूरच्यावतीने आयोजित पाच दिवसीय माता महाकाली महोत्सवाच्या शुभारंभाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी महोत्सव समितीचे संयोजक तथा आमदार किशोर जोरगेवार, आमदार सुभाष धोटे, आमदार प्रतिभा धानोरकर, सर्वोदय शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा सुधा पोटदुखे, आदींची उपस्थिती होती. महाकाली मातेचे दर्शन घेण्यासाठी आणि चंद्रपूरकरांचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आज येथे आलो आहे. या देवस्थानाची एक वेगळी ओळख आहे, असे नार्वेकर म्हणाले.
हेही वाचा >>> “भाजपा म्हणजे भाड्याने जमवलेली पार्टी”; सुषमा अंधारे यांची प्रखर टीका, म्हणाल्या…
तत्पूर्वी, महाकाली मातेची पालखी मिरवणूक काढण्यात आली. या पालखीतून ८ किलो चांदीच्या मूर्तीची विधानसभा अध्यक्ष नार्वेकर आणि आमदार जोरगेवार यांच्या हस्ते विधिवत पूजा करून प्रतिष्ठापना करण्यात आली. चंद्रपूरची आराध्य दैवत माता महाकालीची पालखी निघावी, हे माझे स्पप्न होते. गेल्यावर्षीपासून आपण चंद्रपुरात माता महाकाली पालखी मिरवणुकीची सुरुवात केली. हे स्वप्न पूर्ण झाल्याचा आनंद असल्याचे आमदार जोरगेवार म्हणाले. यावेळी नार्वेकर यांच्या हस्ते पद्मश्री डॉ. परशुराम खुणे, फ्लोरेन्स नाईटिंगेल पुरस्कार प्राप्त परिचारिका पुष्पाताई पोडे, डॉ. रविकांत खोब्रागडे, शर्वरी गुंडावार यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन अलका ठाकरे तर आभार मिलिंद गंपावार यांनी मानले.
‘संजय राऊतांनी माता महाकालीचे दर्शन घ्यावे, सुबुद्धी मिळेल’
शिवसेना आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्यावरून शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर आरोप केले होते. नार्वेकर यांनी राऊतांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले. संजय राऊत यांनी चंद्रपुरात येऊन माता महाकालीचे दर्शन घ्यावे त्यांना नक्कीच सुबुद्धी मिळेल, अशी टीका नार्वेकर यांनी केली.