टीव्ही आणि मोबाईलच्या या युगात माहितीचा तसा विस्फोट झालेला आहे. प्रत्येकाच्या हातात अँड्रॉइड फोन असल्याने मोठ्या प्रमाणात समाज माध्यमावर क्रियाशील राहणे, स्क्रीनवरील वाचणे, व्हिडिओ पाहणे यात समाजातील बऱ्याच लोकांचा वेळ जात आहे. पुस्तक हातात घेऊन वाचण्याची सवय हळूहळू मोडत आहे. या पार्श्वभूमीवर विदर्भात सर्वप्रथम विद्यार्थ्यांसाठी श्री ज्ञानेश महाविद्यालय नवरगावाच्या पुढाकारातून हरिती प्रकाशनच्या वाचन चळवळीच्या सहयोगाने वाचन संस्कृती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.भारतीय शिक्षण संस्थेचे श्री ज्ञानेश महाविद्यालय, नवरगाव जि. चंद्रपूर येथे गोंडवाना विद्यापीठ स्तरीय दोन दिवशीय स्व. परमानंद पाटील बोरकर स्मृती वाचन संस्कृती कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेत विविध महाविद्यालयातील १२७ विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यातही मुलींची उपस्थिती लक्षणीय होती.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा