नागपूर : नागपूरसह देशभरात सोने- चांदीचे दर स्थिर होण्याचे नाव घेत नाही. रोज या धातूच्या दरात बदल बघायला मिळत आहे. नवीन वर्षात एखादवेळा दर घसरले असले तरी इतर दिवशी सातत्याने कमी- अधिक प्रमाणात दरात वाढ नोंदवली जात आहे. दरम्यान नववर्षातील पहिल्या वीस दिवसांत सोन्याच्या दरात मोठे बदल झाले आहेत.

नागपूरसह राज्याच्या विविध भागात हल्ली लग्न, वाढदिवसासह इतरही कार्यक्रमांचे आयोजन वाढले आहे. या कार्यक्रमात आजही अनेक नागरिक सोने- चांदीचे दागिने वा इतरही वस्तू भेट देत असतात. त्यामुळे आता नागपुरातील सराफा व्यवसायिकांकडे ग्राहकांची गर्दी दिसत आहे. या ग्राहकांकडून लग्न असल्यास मंगळसूत्र वा इतर दागिने, बारसे असल्यास बाळासाठी चाळ तर इतरही ग्राहकांकडून विविध कार्यक्रमानुसार दागिन्यांना मागणी आहे.

Rinku Singh marriage announcement with mp priya saroj
क्रिकेटपटू रिंकू सिंहचं खासदार प्रिया सरोजशी विवाह ठरला; दोघांच्या कुटुंबियांनी दिली मान्यता
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
woman from Karachi now Nagpur daughter in law struggled for three decades to gain Indian citizenship
नागपूर : तीन दशकाच्या संघर्षानंतर पाकिस्तानी सून बनली भारतीय नागरिक…
RG Kar Medical College Kolkata Case Verdict Updates in Marathi
RG Kar Doctor Rape Case Verdict : कोलकाता बलात्कार आणि हत्या प्रकरणात आरोपी संजय रॉयला जन्मठेप, न्यायालयाचा निकाल
Greeshma Poisoning Case Verdict
Greeshma Poisoning Case Verdict: विष देऊन बॉयफ्रेंडला मारलं; न्यायालयानं गर्लफ्रेंडला सुनावली मृत्यूदंडाची शिक्षा, मन सुन्न करणारी क्राइम स्टोरी
Rahul Shewale On Congress MLA
Rahul Shewale : “राज्यात २३ जानेवारीला राजकीय भूकंप होणार”, शिंदे गटाच्या नेत्याचा मोठा दावा; म्हणाले, “१० ते १५ आमदार…”
Maharashtra Live News Updates in Marathi
Maharashtra News LIVE Updates : पालकमंत्री पदाच्या मुद्द्यावर शिंदे नाराज आहेत का?, बावनकुळे म्हणाले…
Saif ali Khan Attacker attack
Saif Ali Khan : एका पराठ्यामुळे सापडला सैफचा हल्लेखोर; पोलिसांच्या जाळ्यात कसा अडकला? वाचा घटनाक्रम!

हेही वााचा…नागपूर : तीन दशकाच्या संघर्षानंतर पाकिस्तानी सून बनली भारतीय नागरिक…

दरम्यान, नववर्षात सोन्याचे दर वाढल्याने ग्राहकांमध्ये चिंता होती. परंतु गुरूवारी ९ जानेवारीला सोन्याच्या दरात बदल झाला. आता सोन्याचे दर चढतीवरच आहे. नागपुरातील सराफा बाजारात नववर्षाच्या पहिल्या दिवशी १ जानेवारी २०२५ रोजी सोन्याचे दर प्रति दहा ग्राम ७६ हजार ९०० रुपये, २२ कॅरेटसाठी ७१ हजार ५०० रुपये, १८ कॅरेटसाठी ६० हजार रुपये, १४ कॅरेटसाठी ५० हजार रुपये नोंदवले गेले होते. हे दर २० जानेवारी २०२५ रोजी २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्राम ७९ हजार ६०० रुपये, २२ कॅरेटसाठी ७४ हजार रुपये, १८ कॅरेटसाठी ६२ हजार १०० रुपये, १४ कॅरेटसाठी ५१ हजार ७०० रुपये नोंदवले गेले. त्यामुळे राज्यात १ जानेवारी २०२५ रोजीच्या तुलनेत २० जानेवारी २०२४ रोजी सोन्याचे दर २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्राम २ हजार ७०० रुपये, २२ कॅरेटसाठी २ हजार ५०० रुपये, १८ कॅरेटसाठी २ हजार १०० रुपये, १४ कॅरेटसाठी १ हजार ७०० रुपये वाढल्याचे दिसत आहे.

हेही वााचा…Video : आगीच्या ज्वाळा अन् धुराचे लोट, महागड्या कार भस्मसात; मलकापूरमध्ये भीषण…

चांदीच्या दरातही मोठे बदल…

नागपुरातील सराफा बाजारात १ जानेवारी २०२५ ला चांदीचे दर ८६ हजार ७०० रुपये प्रति किलो होते. हे दर २० जानेवारी २०२५ रोजी ९१ हजार ६०० रुपये प्रति किलो नोंदवण्यात आले. त्यामुळे १ जानेवारी २०२५ रोजीच्या तुलनेत नागपुरात २० जानेवारी २०२५ रोजी चांदीच्या दरात ४ हजार ९०० रुपये प्रति किलो वाढ झाली आहे.

Story img Loader