महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीचा निकाल उद्या सोमवारी जाहीर होणार आहे. शिक्षण उपसंचालक कार्यालयाने अकरावीच्या केंद्रीकृत प्रवेशाचा कार्यक्रम जाहीर केला असून निकाल जाहीर होताच सोमवारपासून प्रवेश अर्ज विक्रीची प्रक्रिया सुरू होणार आहे.
शहरातील विविध भागातील २४ केंद्रांवर ११ जूनपर्यंत अर्ज वितरित केले जाणार आहे. विद्याथ्यार्ंनी आवेदनपत्र भरून व प्रमाणपत्राच्या साक्षांकित प्रतीसह केंद्रीय प्रवेश समितीने निश्चित केलेल्या संकलन केंद्रावर सादर करावयाचे आहे. शहराबाहेरील विद्यार्थी, सीबीएसई व इतर मंडळाकडून इयत्ता दहावी उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांनी आवेदन पत्र प्राप्त करण्यासाठी केंद्रीय प्रवेश समितीने वितरण केंद्र निश्चित केले आहे. इयत्ता अकरावी केंद्रीय प्रवेश समितीची वेबसाईट ‘डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू. सीएपी ११एनजीपी.ओआरजी’ या वेबसाईटवर अधिक माहिती मिळेल किंवा केंद्रीय प्रवेश मुख्य केंद्र धनवटे नॅशनल कॉलेजमध्ये संपर्क साधावा.
आवेदन पत्र विक्री केंद्र – पूर्व विभाग – अन्नपूर्णाबाई देशमुख उच्च माध्यमिक विद्यालय, लगडगंज, राजेंद्र उच्च माध्यमिक विद्यालय नंदनवन, विदर्भ बुनियादी उच्च माध्मिक शाळा ओमनगर, बाबानानक उच्च माध्यमिक विद्यालय गरोबामैदान, जयस्वाल उच्च माध्यमिक शाळा.
पश्चिम विभाग – सेंट उर्सुला उच्च माध्यमिक विद्यालय, सिव्हील लाईन, तिडके उच्च माध्यमिक विद्यालय, काटोल मार्ग, एमकेएच संचोती विद्यालय, वर्धा मार्ग, अल अमी उच्च माध्यमिक शाळा जाफरनगर, न्यू कुर्वेज उच्च माध्यमिक शाळा श्रद्धानंद पेठ, हिस्लॉप महाविद्यालय सिव्हील लाईन्स, संताजी कनिष्ठ महाविद्यालय वर्धा मार्ग.
उत्तर विभाग – दयानंद आर्य कन्या उच्च माध्य विद्यालय, सिंधी हिंदी बॉईज उच्च माध्यमिक विद्यालय, किडवाई उच्च माध्यमिक शाळा, दक्षिण विभाग- मेजर हेमंत जकाते विद्यानिकेतन, म्हाळगीनगर, डॉ. बाबा न्यू अपोलिस्टीक विद्यालय, नवप्रतिभा माध्यमिक विद्यालय मिरचीबाजार, दीनानाथ विद्यालय धंतोली, वंदेमातरम उच्च माध्यमिक शाळा, अवधूतनगर, मध्य विभाग- न्यू इंग्लिश स्कूल महाल, धनवटे नगर विद्यालय महाल, सी. बी. आदर्श माध्यमिक विद्यालय सेंट्रल अ‍ॅव्हेन्यू.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा