लोकसत्ता टीम
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
यवतमाळ : येथील वसंतराव नाईक शासकीय महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या एमबीबीएस प्रथम वर्षाच्या विद्यार्थिनीने गळफास घेवून आत्महत्या केली. ही घटना आज शुक्रवारी उघडकीस आली.
सुहानी सहदेव ढोले (१९, रा. धाराशीव), असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. एमबीबीएस अभ्यासक्रमाला प्रवेश मिळाल्यानंतर वैद्यकीय महाविद्यालय परिसरात असलेल्या वसतिगृहात ती राहत होती. आईने सुहानीला फोन केला. मात्र, प्रतिसाद मिळत नसल्याने तिच्या एका मैत्रीणीच्या मोबाईलवर संपर्क साधला व सुहानीसोबत संपर्क होत नसल्याचे सांगितले. त्यामुळे मैत्रीणीने आवाज देऊन बघितला. आतून काहीही प्रतिसाद मिळत नसल्याने खिडकीतून आत बघितले असता, सुहानी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली. या घटनेची माहिती विद्यार्थीनीने प्राध्यापकांना दिली.
आणखी वाचा-धक्कादायक! ‘समृद्धी’वरील लोखंडी भाग तुटून आला वर…
घटनेची माहिती यवतमाळ शहर पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला. पोलिसांना घटनास्थळी एक चिठ्ठी आढळली असून, त्यात माझ्या आत्महत्येला कुणालाही जबाबदार धरण्यात येऊ नये, असा उल्लेख असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. याप्रकरणी यवतमाळ शहर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेने वैद्यकीय महाविद्यालयात खळबळ उडाली आहे.