नागपूर : विधवेला अनैतिक संबंधातून झालेल्या पाच दिवसांच्या बाळाची पाच लाख रुपयांत परराज्यात विक्री केल्याचे आणखी एक प्रकरण उपराजधानीत उघडकीस आले. या बाळाची विक्री रेखा पुजारी या टोळीने केली असून, आतापर्यंत रेखाने २० पेक्षा नवजात बाळ विक्री केल्याची माहिती समोर आली आहे. अनैतिक मानवी वाहतूक पथकाने आतापर्यंत १७ बाळांना विक्री केल्याचे प्रकरण उघडकीस आणून ५७ आरोपी निष्पन्न केले आहेत, हे विशेष.

बालाघाटमध्ये राहणारी ३० वर्षीय विधवा महिला संजना (काल्पनिक नाव) ही दोन मुलांसह राहत होती. तिचे वस्तीतच राहणाऱ्या एका युवकाशी अनैतिक संबंध होते. तो युवक वारंवार विधवेच्या घरी येत होता. काही काळानंतर ती गर्भवती राहिल्याचे लक्षात आले. तिला गर्भपात करायचा होता. त्यामुळे ती नागपुरातील नातेवाईकांकडे आली. तिला बाळ विक्री करणाऱ्या टोळीची सदस्य मुन्नीबाई लिल्हारे हिने हेरले. तिने रेखा पुजारी या तोतया डॉक्टरशी भेट घालून दिली. रेखाने तिला गर्भपात केल्यास जिवाला धोका असल्याचे सांगून प्रसुतीचा खर्च करून बाळ दत्तक घेण्याचे ठरवले. नि:शुल्क उपचार आणि जिवाला धोका असल्यामुळे ती बाळाला जन्म देण्यास तयार झाली. रेखा पुजारी आणि मुन्नीबाई हिने तिला दोनदा धंतोलीतील बाळविक्रीसाठी चर्चित असलेल्या हॉस्पिटलमध्ये नेले. त्यानंतर संजनाला मेयोत दाखल केले. संजनाला मुलगा झाला. तिला बाळासह घरी आणले. रेखा आणि मुन्नीबाई हिने बाळासाठी ग्राहक शोधणे सुरू केले.

57 lakh worth of goods seized in Nashik district in two days nashik news
नाशिक जिल्ह्यात दोन दिवसात ५७ लाखांचा मुद्देमाल जप्त
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Little girl Happiness to burst the bubble wrap
VIRAL VIDEO : ‘बबल रॅप म्हणजे प्रेम!’ चिमुकलीचा उत्साह पाहून नेटकऱ्यांनी केल्या कमेंट्स; म्हणाले, ‘आम्हीसुद्धा लहानपणी…’
kama Hospital study shows increased diabetes prevalence in pregnant women due to changing lifestyles
गर्भधारणेच्या वेळी महिलांना मधुमेहाचा धोका
chatura cesarean delivery
स्त्री आरोग्य: गर्भजल कमी असल्यास ‘सिझेरियन’ अनिवार्य आहे?
Childrens day 2024 | childhood days never come back
Children’s day 2024 : बालपणीचे दिवस परत कधीही येत नाही! VIDEO पाहून आठवेल तुम्हाला तुमचे बालपण
Mega Housing Lottery application process, entension, CIDCO
सिडकोच्या २६ हजारांच्या महागृहनिर्माण सोडत प्रक्रियेला महिन्याभराची मुदतवाढ

हेही वाचा – राणा दाम्‍पत्‍य उभारणार १११ फुटांची विशाल हनुमान मूर्ती

५ लाख रुपयांत विक्री

रेखा पुजारी आणि मुन्नीबाई यांनी परराज्यातील एका निपुत्रिक मारवाडी दाम्पत्याचा शोध घेतला. व्यावसायिक असलेल्या दाम्पत्याला ५ लाख रुपयांत पाच दिवसांचे बाळ विकले. संजना हिने बाळाबाबत विचारणा केली असता दोघींनीही दत्तक दिल्याचे सांगून कुणाला काही सांगितल्यास जिवे मारण्याची धमकी दिली.

हेही वाचा – मुलीचे पोट वाढत असल्याचे पाहून आईने चौकशी केली, पुढे आले धक्कादायक..

असे आले प्रकरण उघडकीस

गुन्हे शाखेच्या एएचटीयूच्या प्रमुख रेखा संकपाळ यांनी विधवा संजना हिचा शोध घेतला. तिला विश्वासात घेऊन बाळ विक्री केल्याचा गुन्हा उघडकीस आणला. आरोपी रेखा पुजारी आणि मुन्नीबाई लिल्हारे या दोघीही सध्या अन्य गुन्ह्यात कारागृहात आहेत. ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, गुन्हे शाखेचे उपायुक्त मुमक्का सुदर्शन यांच्या मार्गदर्शनात एएचटीयूच्या सहायक पोलीस निरीक्षक रेखा संकपाळ यांच्या पथकाने केली.